Tuesday, April 23, 2024

Prabha Atre Death | ‘या’ कारणामुळे आज नाही तर सोमवारी होणार प्रभा अत्रे यांच्यावर अंतिम संस्कार, मोठी माहिती आली समोर

Prabha Atre Death | ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. पहाटे त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू होण्याआधी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनाने संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झालेली आहे.

त्यांनी शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार केला. आणि त्या युट्युबच्या माध्यमातून देखील काम करत होत्या. प्रभा अत्रे यांचे आज दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या राहत्या घरी पुण्यात निधन झालेले आहे. परंतु प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेमध्ये स्थायिक असल्याने त्यांच्यावर लगेचच अंतिम संस्कार करण्यात येणार नाहीत.

हाती आलेल्या माहितीनुसार त्यांचे अंतिम संस्कार हे सोमवारी करण्यात येणार आहेत. पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यादरम्यान त्यांचे मृत्यू झाले त्यांची भाची अमेरिकेत असल्याने ती आल्यानंतरच त्यांच्या अंतिम संस्काराची वेळ सगळ्यांना कळविण्यात येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

धनुषचा कॅप्टन मिलर पडला सगळ्यांवर भारी, पहिल्याच दिवशी केली ‘एवढी’ कमाई
मायकेल जॅक्सनची कहाणी उतरणार रुपेरी पडद्यावर, ‘हा’ अभिनेता साकारणारा मुख्य भूमिका

हे देखील वाचा