शिक्षिकेच्याच प्रेमात पडला होता बॉलीवूडचा ‘हा’ सुपरस्टार, सिनेमातून दाखवली होती ‘रियल’ लव्हस्टोरी


शोमॅन राज कपूर यांचा महत्वाकांक्षी चित्रपट म्हणून ‘मेरा नाम जोकर’ सिनेमा ओळखला जातो. तब्बल सहा वर्ष राज कपूर यांनी ह्या सिनेमावर काम केले आणि डिसेंबर १९७० मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला. ह्यावर्षी ‘मेरा नाम जोकर’ सिनेमाला प्रदर्शित होऊन ५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने याचित्रपटाची एका आठवण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

‘मेरा नाम जोकर’ ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची लांबी. जवळपास २४४ मिनिटांच्या या चित्रपटाचा समावेश सर्वात लांब असणाऱ्या चित्रपटांच्या यादीत होतो. त्यामुळेच या सिनेमात दोन मध्यांतर घेतले गेले. राज कपूर, सिमी ग्रेवाल, मनोज कुमार, धर्मेंद्र, पद्मिनी कोल्हापूर, दारासिंग, अचला सचदेव, ओमप्रकश, राजेंद्र कुमार, राजेंद्रनाथ आणि ऋषी कपूर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात दिसली.

‘मेरा नाम जोकर’ सिनेमातून ऋषी कपूर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाचा श्रीगणेशा केला. शंकर-जयकिशन यांच्यासारख्या महान संगीतकारांनी चित्रपटाला संगीत दिले होते. यातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर येतात. चित्रपटासंबंधी अनेक जमेच्या बाजू असूनही हा सिनेमा प्रेक्षकांना जास्त भावला नाही, मात्र समीक्षकांनी चित्रपटाचे तोंड भरून कौतुक केले. हा चित्रपट तीन भागांमध्ये विभाजित केला होता. चित्रपटाचा मुख्य नायक राजुच्या आयुष्यातील तीन महत्वाच्या टप्यांचा समावेश या तीन भागात दाखवला आहे

या चित्रपटाचा पहिला भाग हा राज कपूर यांच्या खऱ्या जीवनावरून प्रेरित होता. याबद्दल स्वतः सिमी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. या भागात ऋषी कपूर, सिमी ग्रेवाल आणि मनोज कुमार होते. यात ऋषी कपूर हे त्यांच्या पेक्षा मोठ्या असलेल्या त्यांच्या टिचरच्या प्रेमात पडतात. टीचरकडून मिळणारे प्रेमळ वागणे पाहून त्यांचे प्रेम अधिक वाढते असे दाखवले आहे.

सिमी यांनी या कथेबद्दल एकदा सांगितले होते की, राज कपूर यांनी मला सांगितले की, ते Col Brown’s शाळेत शिकत असतांना एका एंग्लो इंडियन टिचरवर त्यांचा क्रश होता. पुढे ते शांतीनिकेतनमध्ये आले. तिथे त्यांना दमयंती नावाच्या मुलीवर त्यांचा क्रश आला. हीच दमयंती पुढे दमयंती सहानी झाली. तिने दिग्ग्ज कलाकार बलराज साहनी यांच्यासोबत लग्न केले. या चित्रपटाला माझी ‘मेरी’ हि भूमिका दमयंती आणि एंग्लो इंडियन टीचर या दोन्ही व्यक्तिमत्वांवर आधारित होती. मला असं वाटत की ‘मेरी’ या रोलने मला खूप काही दिले. माझा अतिशय लोकप्रिय आणि चर्चित रोल म्हणून मी नेहमीच या भूमिकेकडे बघते.”

या सिनेमाने जरी तिकीट खिडकीवर कमाल दाखवली नसली तरी त्यावर्षीच्या पुरस्कांवर ‘मेरा नाम जोकर’चेच वर्चस्व दिसले.


Leave A Reply

Your email address will not be published.