खलनायकाची भूमिका साकारणारे बॉलीवूडचे प्रसिद्ध खलनायक रणजीत यांनी आपल्या भूमिकेने सर्वांच्या मनात घर केले आहे. ते आज आपला ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४६ साली जंडियाला गुरू येथे झाला होता. त्यांचे नाव आजही बॉलीवूडमधील सर्वात खतरनाक खलनायकांमध्ये घेतले जाते. रणजीत यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास २०० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची ओळख एकेकाळी रेपिस्ट म्हणून होत होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी निगडीत रंजक गोष्टीवर टाकलेली एक नजर…
सन १९७० आणि १९८० या दशकांमध्ये रणजीत बॉलीवूडमधील प्रसिद्ध खलनायक होते. आजही त्यांच्या त्या अंदाजासाठी ओळखले जाते. रणजीत यांच्याशी निगडीत अनेक किस्से आहेत. परंतु एक असा किस्सा आज आपण पाहणार आहोत, ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावतील.
रणजीत यांनी जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात त्यांनी जवळपास १५० चित्रपटांमध्ये रेप (बलात्कार) सीन केले आहेत. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी स्वत: ते सर्व चित्रपट पाहिले नाहीत.
याबद्दल बोलताना रणजीत यांनी टीव्ही शोदरम्यान सांगितले होते. खरंतर रणजीत एकदा अभिनेता शक्ती कपूर यांच्यासोबत टीव्ही शो ‘एंटरटेनमेंट की रात’मध्ये सामील झाले होते. यावेळी त्यांनी स्वत: सांगितले होते की, त्यांनी जवळपास १५० चित्रपटांमध्ये रेप सीन केला आहे. परंतु त्यांनी स्वत: आतापर्यंत केवळ १० चित्रपट पाहिले आहेत.
यादरम्यान रणजीत यांना त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, “जेव्हा घरच्यांनी टीव्हीवर मला बलात्कार करणाऱ्या भूमिकेत पाहिले, तेव्हा मला घरात येऊ दिले नाही. आई-वडील, नातेवाईक सर्वांनी माझ्याशी संबंध ठेवणे बंद केले होते. आई म्हणाली होती की, ‘तू असं काम केलंय, आता आम्ही लोकांना काय तोंड दाखवायचे?'”
यादरम्यान रणजीत यांनी आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य सांगताना म्हटले होते की, “मी कधीच जिममध्ये गेलो नाही. माझ्या काळात आजच्यासारखे जिमची क्रेझही नव्हती. आयुष्यात मी कधीच मांसाहार केला नाही आणि कधीच दारूचे सेवन केले नाही.”
रणजीत यांनी अमर अकबर अँथनी, धर्मात्मा, हाऊसफूल २, नमक हलाल, प्रेम प्रतिज्ञा, करण- अर्जुन, लावारिस, कैदी, कोयला, मुकद्दर का सिकंदर, शर्मीली, खोटे सिक्के, इन्कलाब, तेजा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा-
–प्रेम चोप्रांकडून झाली होती गलती से मिस्टेक! नायिकेने चुकीला माफी नाही म्हणत कानाखाली काढला होता जाळ
–सनी-अमृताच्या प्रेमाची गाडी जोरात धावत होती; परंतू असा झाला होता अमृताला धोका, पुढे सैफबरोबर थाटला संसार
–टीव्ही इंडस्ट्रीमधील असे प्रेमीयुगूल, ज्यात एका जोडीदाराने दुसऱ्याला दिला धोका अन् ओढवलं ब्रेकअपचं संकट
–जॉनने एक चुकिचा मेसेज टाकला अन् बिपाशाला आपल्याबरोबर धोका झाल्याचे समजले…