सनी-अमृताच्या प्रेमाची गाडी जोरात धावत होती; परंतू असा झाला होता अमृताला धोका, पुढे सैफबरोबर थाटला संसार


८०/९० च्या दशकात सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी आपले नाव कोरणारी अभिनेत्री म्हणजे, अमृता सिंग. आज अमृता सिंग यांचा ६३ वा वाढदिवस. ९ फेब्रुवारी १९५८ ला अमृता यांचा जन्म झाला. अमृता यांनी १९८३ ला आलेल्या ‘बेताब’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्या इंडस्ट्रीत आल्या आल्या अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला लागली.

अमृता सिंग तिच्या पहिल्याच सिनेमामुळे जोरदार चर्चेत आली. त्यांचे कारण म्हणजे, अमृता आणि सनी यांच्या अफेयरच्या बातम्या तेव्हा येऊ लागल्या. या दोघांची पहिली भेट ‘बेताब’ चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान झाली. त्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. त्यांची जोडी प्रेक्षकांनाही खूप भावली. त्यांनी अजून एका सिनेमात सोबत काम केले. असे म्हटले जाते की, दुसऱ्या सिनेमाच्या चित्रीकरण दरम्यान अमृता सनीच्या आकंठ प्रेमात बुडाल्या होत्या. त्यांना सनी देओलसोबत लग्न करायचे होते. मात्र सनी चित्रपटांमध्ये येण्या आधीपासूनच विवाहित होते. त्यांनी त्यांच्या करियरचा विचार करत ही गोष्ट लपवून ठेवणे योग्य समजले होते.

अमृता सिंग यांनी सनी यांच्यासोबत लग्नाचा हट्ट धरला. पण अमृता यांच्या आईला हे नाते मान्य नव्हते. तरीही मुलीच्या इच्छेमुळे त्यांनी सनी देओल यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा सनी यांनी त्यांचे लग्न झाल्याची माहिती दिली, तेव्हा अमृता पूर्णपणे कोलमडून पडल्या, आणि त्या मागे हटल्या. सनी यांच्या लग्नाची बातमी देखील मीडियामध्ये आली. तेव्हा सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले होते.

त्यानंतर अमृता यांचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले. त्यातले एक मोठे नाव म्हणजे भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू व सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे होते. मात्र काही काळाने हे नाते देखील संपुष्टात आले.

मग अमृताच्या आयुष्यात सैफ अली खानची एंट्री झाली. फक्त तीन महिन्यांच्या अफेयरनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या दोघांनी घरातून पळून जाऊन कोणालाही न सांगता १९९१ मध्ये लग्न केले. दोघांनाही घरच्यांची भीती होती की, ते यांचे नाते स्वीकारतील की नाही. कारण सैफचा जन्म १९७० सालचा तर अमृताचा जन्म १९५८चा. अमृता सैफ पेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. मात्र सुदैवाने असे काही झाले नाही आणि हे नाते स्वीकारल्या गेले.

मनोरंजन क्षेत्रातील मनोरंजक बातम्यांसाठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉइन करा येथे क्लिक करा…

साल १९९१ मध्ये झालेले हे लग्न काळ टिकू शकले नाही आणि, त्यांनी २००४ मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुलं असून, सारा चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. सारा जवळपास अमृतासारखीच दिसते असे अनेक चाहत्यांचे मत आहे.

अमृताने दुसरे लग्न केले नसून, त्या अजून देखील चित्रपटांमध्ये काम करतात. तर सैफने २०१२ साली वयाने १० वर्ष लहान असलेल्या करीना कपूरसोबत लग्न केले आहे. त्यांना तैमूर हा मुलगा आहे, तर लवकरच ते दुसऱ्या बाळाचे आई, बाबा सुद्धा होणार आहे.

हेही वाचा
– ‘तू जर कुठं भेटला ना, तर तुला ठोकतच असतो मी’ सनी देओलने खुलेआम दिली होती धमकी
पुर्णपणे दारुच्या आहारी गेलेल्या बॉबी देओलने त्या दिवशी दाढी केली नसती तर परत सिनेमात दिसलाच नसता!
ड्रीमगर्ल हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत या अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.