Friday, July 5, 2024

क्या बात! २२ वर्षीय अनन्या पांडेने शेअर केलेल्या दोन फोटोंवर शाहरुखच्या पत्नीसह अनेकांच्या कमेंट्स, पाहा फोटो

दिग्गज अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्याने २०१९ वर्षात बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. स्टुडंट ऑफ द एअर सिनेमातून तीने हे पदार्पण केले होते. २२ वर्षीय अनन्या पांडेने आतापर्यंत रिलीझ झालेल्या तीन सिनेमांत काम केले आहे. ती लवकरच विजय देवरेकोंडासोबत त्याच्या ‘लाइगर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडाचा अ‍ॅक्शन अवतार दिसणार आहे, तर अनन्या पांडे ग्लॅमरस अवतारात दिसणार आहे. ग्लॅमरस अवतारात दिसणारी हीच अनन्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आताही ती चर्चेत येण्याच कारण म्हणजे तीचे ग्लॅमरस फोटो.

अनन्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे, ज्यामध्ये ती बरीच ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. शिवाय अनन्या पांडेच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटी देखील कमेंट्स करत आहेत. तिची मैत्रिण शनाया कपूरने तर हा तिचा आजपर्यंतचा सर्वात जबरदस्त फोटो असल्याचे म्हटले आहे.

अनन्याने हे फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘जा तुमची व्हिडिओ गेम खेळा’. बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेच्या फोटोला गौरी खानने देखील लाईक केले आहे. इतकेच नव्हे तर तिची बालमैत्रिण शनाया कपूरने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘हा माझा आतापर्यंतचा सर्वात आवडता फोटो आहे’. सेलीब्रेटींनी कमेंट्स व लाईक करण्यामुळे या फोटोची जोरात चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिला कार्तिक आर्यन आणि भूमी पेंडणेकर यांच्यासोबत ‘पति पत्नी और वो’ मध्ये देखील पाहिले गेले होते. नुकतीच अनन्या पांडे अभिनेता ईशान खट्टर सोबत ‘खाली पीली’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. आता तिचा ‘लाइगर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा
सनी लिओनीने वाढवला इंटरनेटचा पारा, बिकिनीमधील बोल्ड फोटो केला शेअर, चाहतेही झाले घायाळ
हरभजन सिंगने आपल्या पहिल्या चित्रपटाबाबत केली मोठी घोषणा; या अभिनेत्रीसोबत करणार काम, शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर
बागेत बाग राणीची बाग स्वप्नालीने आस्तादसाठी घेतलेल्या या खास उखाण्याने गाजवला सोशल मीडिया

हे देखील वाचा