‘बागेत बाग राणीची बाग…’, स्वप्नालीने आस्तादसाठी घेतलेल्या ‘या’ खास उखाण्याने गाजवला सोशल मीडिया

Actress Swapnali Patil took Ukhana for her husband Astad Patil


अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक आस्ताद काळे यांनी काही दिवसांपुर्वी पुण्यात लग्नाची गाठ बांधली. आस्ताद आणि स्वप्नाली यांनी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेनिमित्त लग्न केले.

स्वप्नाली तिच्या लग्नाच्या वेषात खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने लाल आणि सोनेरी रंगाची रेशमी साडी परिधान केली. घातलेल्या दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली. ती एक परिपूर्ण महाराष्ट्रीय वधूसारखी दिसत होती. आस्तादने लग्नावेळी मॅजेन्टा शेरवानी आणि शालमध्ये साथ दिली.

लग्नातील एका खास विधीने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पारंपारिक लग्नात वर- वधू एकमेकांसाठी उखाणे घेतात, हे आपणांस माहित आहेच, परंतू काही सेलेब्रिटीही याला काही अपवाद नाहीत. आता स्वप्नालीनेही आस्तादसाठी एक उखाणा घेतला. “बागेत बाग राणीची बाग, आस्तादचा राग म्हणजे धगधगणारी आग” असा आगळावेगळा परंतु एकदमच हटके उखाणा स्वप्नालीने घेतला. उखाण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दोघांनी जवळच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. तसेच, त्यांनी रजिस्टर पद्धतीच्या लग्नाला प्राधान्य दिले. स्वप्नाली आणि आस्ताद यांची सहकलाकार हर्षदा खानविलकर, अभिजीत केळकर आणि संग्राम समेल यांनी देखील लग्नाला उपस्थिती लावली होती. अनेक कलाकारांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर वधूसोबतचे फोटो शेअर केले.

 

वर्कफ्रंटबद्दल बोलयाच झालं तर स्वप्नाली सध्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या शोमध्ये मोठी भूमिका साकारत आहे. ‘पुढचे पाऊल’ या टीव्ही कार्यक्रमातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. दुसरीकडे, आस्ताद ‘बिग बॉस मराठी’ मध्ये स्पर्धक होता. आता सध्या तो सुबोध भावे समवेत ‘चंद्र आहे साक्षीला’ या टीव्ही कार्यक्रमात एक रोचक पात्र साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-
सैराट मधील लंगड्या आता घालणार गस्त तानाजी गालगुंडे दिसणार नव्या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना
झी स्टुडिओजच्या ‘आनंदी गोपाळ’ ने रचला नवा इतिहास
इमेल फिमेल हा धमाल मराठी चित्रपट 26 फेब्रुवारीला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

 


Leave A Reply

Your email address will not be published.