Monday, May 11, 2026
Home साऊथ सिनेमा तेलगू अभिनेते के. भरत कांत आणि सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांचा एका भीषण कार अपघातात मृत्यू

तेलगू अभिनेते के. भरत कांत आणि सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांचा एका भीषण कार अपघातात मृत्यू

तरुण अभिनेता भरतकांत हे एक तेलगु अभिनेता आहे. आणि आता याच्या बाबत एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख तरुण अभिनेता भरतकांत आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर त्रिलोक यांचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. 11 मे 2026 रोजी पहाटे हैदराबादमधील आऊटर रिंग रोडवर एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी आदरणीय आहे. अनेक चहा त्यांना ही बातमी धक्का बसला आहे. तसेच सोशल मीडियावर सध्या या दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करत आहे. आणि चाहते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी प्रार्थना करत आहेत.

पोलिस आणि वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार,  भरत (bharat)कांत आणि त्रिलोक नेल्लोरहून हैदराबादला कारने प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनर लॉरीने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अभिनेता भरतकांत अन् सिनेमॅटोग्राफर त्रिलोक यांचा जागीच मृत्यू झाला. आदिबटला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही धडक ट्रकच्या मागून झाली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत.

भरत कांत हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक चमकता तारा होते. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टेनंट’ 2024 या चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे त्यांनी प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. तर त्रिलोक हे एक उत्तम सिनेमॅटोग्राफर होते. तर यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीच खुप नुकसान झाल आहे.

ना मोठा स्टार, ना भलंमोठं बजेट; तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकुळ

हे देखील वाचा