आजकाल अनेक चित्रपट हे भरमसाट पैसा खर्च करुन चित्रपट निर्माते तो चित्रपट तयार करतात. तसेच ते काही गाजतात काही नाही पण याचे प्रमाण बॉलीवूड असो वा दाक्षिणात्य यामध्ये मोठे बजेट असेलेले चित्रपट दिसतात. कारण त्याचे भव्य सेट, नेत्रदीपक नृत्य दृश्ये, आकर्षक ठिकाणे आणि मोठे स्टार्स अनेकदा चित्रपटांचे बजेट गगनाला भिडवतात. पण काही चित्रपटाने बजेट पेक्षा आशय यावर लक्ष दिले आहे. ते चित्रपट म्हणजे अलिकडच्या वर्षांत प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’, ‘बाघी 4’ आणि ‘द राजा साब’ यासारखे बरेच आहेत. तर असाच एक चित्रपट म्हणजे ज्याने निर्मात्यांना प्रचंड नफा मिळवून दिला.
हा चित्रपट म्हणजे ‘मुंगारू माले’, 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला तर तो 2006 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. 1 कोटी रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या प्रचंड बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्वत्र धुमाकुळ घातला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच हा चित्रपट तो वर्षभरापेक्षा जास्त काळ चित्रपटगृहांमध्ये सुरू होता.
‘मुंगारू माले’ या चित्रपटामध्ये कोणतीही मोठी स्टार कास्ट नव्हती तरीही ही चित्रपट प्रंचड गाजला. तर हा चित्रपट रोमँटिक ड्रामा शैलीचा होता. योगराज भट यांनी या चित्रपयाचे दिग्दर्शन केले होते. तसेच या मध्ये गणेश आणि पूजा (pooja)गांधी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. बंगळूरमधील पीव्हीआरमध्ये 460 दिवस चाललेला हा चित्रपट एक खळबळ बनला आणि सर्वांना थक्क करून गेला.
‘रामायण’मधील विभीषणचा वेदनादायक शेवट, 10 वर्षांपूर्वी जगाचा घेतला होता निरोप










