पवन सिंगचे बहुप्रतिक्षित ‘बबुनी तेरे रंग मे’ गाणे रिलीझ, अभिनेत्री त्रिधाने लावले जोरदार ठुमके

Bhojpuri singer pawan Singh's new song realese


भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगचे बहुप्रतिक्षित गाणे रिलीझ झाले आहे. त्याचे ‘बबुनी तेरे रंग में‘ गाणे रिलीझ झाले आहे. पवन सिंगच्या चाहत्यांना खूप दिवसापासून या गाण्याची आतुरता लागली होती. यूट्यूबवर या गाण्याचा टिझर आधीच रिलीझ झाला होता. या टिझरला देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद आलेला दिसून येत आहे. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड देखील झाले आहे.

पवन सिंगचे हे गाणे हिंदीमध्ये आहे. परंतु गाण्याला भोजपुरी टच असल्याकारणाने भोजपुरी प्रेक्षकांकडून देखील या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

हे गाणे पवन सिंग आणि शार्वी यादव यांनी गायले आहे. पवन सिंग आणि त्रिधा चौधरी यांच्यावर या गाण्याचे चित्रीकरण केले आहे. या गाण्याचे लिरिक्स ‘मुंबई काबा’ फेम लेखक डॉक्टर सागर यांनी लिहिले आहे, तर सलीम सुलेमान यांनी संगीत दिले आहे.

हे गाणे मर्चंट रेकॉर्डसने आपल्या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ केले आहे. हे गाणे रिलीझ होताच केवळ एका तासात या गाण्याला 58 हजार पेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. या गाण्यातील सगळ्या टीमने खूप चांगले काम केले आहे. यासाठी सगळ्यांचेच कौतुक होताना दिसत आहे.

पवनच्या चाहत्यांना त्याचे हे गाणे खूपच आवडले आहे. या गाण्याला येत असणाऱ्या कमेंटमधून सगळे त्याचे कौतुक करत आहेत. अतुल सिंग नावाच्या एका युजरने हे गाणे ‘ब्लॉकबस्टर’ असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘बॉलिवूडवाल्यांनी आपले दुकान आता बंद करा कारण आता या वाघाची एंट्री झाली आहे.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लय भारी! जस्टिन बीबरच्या गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके, डान्स बघून चाहते घायाळ

-खेसारी लालचं ‘सवा लाख की साडी’ गाणं व्हायरल, एकाच आठवड्यात मिळाले ४९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-ये हुई ना बात! तृतीयपंथी पूजाला घरी बोलवून अंकिताने केला आई- वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा, लावले जोरदार ठुमके


Leave A Reply

Your email address will not be published.