ये हुई ना बात! तृतीयपंथी पूजाला घरी बोलवून अंकिताने केला आई- वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा, लावले जोरदार ठुमके

Actress Ankita lokhande share a video with transgender pooja sharma


‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच अंकिता लोखंडे. आपल्या सालस आणि सोज्वळ अभिनयाने तिने सर्वांचे मन जिंकून घेतले. या मालिकेने तिला खूप ओळख दिली. अंकिताची फॅन फॉलोविंग खूप असल्याने ती त्यांच्याशी जोडून राहण्यासाठी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत अनेक गोष्टी शेअर करत असते. नुकताच अंकिताने तिच्या आई- वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. तिने आई वडिलांना एक खास सरप्राईज दिले आहे, ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अंकिताने तिच्या आई- वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तृतीयपंथी पूजा शर्माला घरी बोलावले होते. हे तिच्या आई- वडिलांसाठी एक सरप्राईज होते. पूजासोबत घालवलेले काही खास क्षण अंकिताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पूजाने देखील अंकिताचे खूप कौतुक केले आहे. त्या दोघींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिता कशाप्रकारे तिच्या सगळ्या फॅन्ससोबत पूजाची ओळख करून देते. आणि तिचा आशीर्वाद घेते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूजा अंकिताच्या आई- वडिलांची दृष्ट काढताना दिसत आहेत. सोबतच ती अंकिताच्या कुटुंबासोबत डान्स करताना ही दिसत आहे. घरातील सगळी मंडळी देखील पूजासोबत खूप खुश आहेत. हा व्हिडिओ शेअर करत अंकिताने तिच्या मनातील गोष्टी कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत.

अंकिताने पोस्ट मध्ये लिहले की, “पूजा दीदी काल तू आमच्या घरी आलीस त्याबद्दल थॅंक यू. मी ती रात्र कधीच विसरू शकत नाही. मला तुझ्याबद्दल खूप काही गोष्टी प्रेक्षकांना सांगायच्या आहेत, पण मला आता काय बोलावं यासाठी शब्द सुचत नाहीत. तू मनाने आणि शरीराने खूप सुंदर आहे. तुझी सकारात्मक ऊर्जा तू आमच्या घरात आल्यापासूनच आम्हाला जाणवत होती. आपण दोघींनी मिळून डान्स केला. तो मला खूप आवडला. दुसऱ्यांसाठी तुझं प्रेम अगदी निस्वार्थ आहे. तू देवाची खूप आवडीची असणार आहे. तू सगळ्यांची दृष्ट काढत असते. पण तुझी दृष्ट कोण काढणार. तुला कोणाचीही दृष्ट लागू नये. नेहमी अशीच आनंदात राहा.”

अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे. सगळ्यांकडून या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

-भोजपुरी गाण्याचा जलवा! सुपरस्टार राकेश मिश्राचं नवीन गाणं यूट्यूबवर करतंय धमाल; एकदा पाहाच

-‘सैयां जी’ गाण्यावर थिरकली निया शर्मा, पण ‘मजा नाही आली ताई’ म्हणत युजर्सने उडवली खिल्ली


Leave A Reply

Your email address will not be published.