खेसारी लालचं ‘सवा लाख की साडी’ गाणं व्हायरल, एकाच आठवड्यात मिळाले ४९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

Khesari lal yadav celebrating his 35 th birthday Khesari lal yadav celebrating his 35 th birthday


भोजपुरी चित्रपट सृष्टीतील गायक आणि अभिनेता खेसारी लाल यादवने सोमवारी (15 मार्च) आपला वाढदिवस साजरा केला. हा दिवस त्याच्यासाठी खूपच खास आहे. चित्रपटात सृष्टीत अनेक कलाकार तसेच त्याचे सगळे चाहते त्याला वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्याचा जन्म 15 मार्च 1886 मध्ये सिवान येथे झाला. त्याने ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तो बिग बॉस 13 चा स्पर्धक देखील होता. भोजपुरी चित्रपटसृष्टीत त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

त्याची अनेक गाणी देखील त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हायरल होताना दिसत आहे. खास करून त्याचे होळी हे गाणे खूपच प्रसिद्ध झाले आहे. ही गोष्ट तर सगळ्याच प्रेक्षकांना माहित आहे की, कोणताही सण यायच्या आधी खेसारी लालचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत असतं. नुकतेच त्याचं होळी गाणे रिलीझ झाले होते. त्या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याचे बोल ‘सवा लाख की साडी’ असे आहे.

हे गाणे खेसारी लाल आणि अंतरा सिंग प्रियांका यांनी गायले आहे. त्याने ‘सवा लाख की साडी’ हे गाणे 9 मार्चला त्याच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले होते. या गाण्याचे लिरिक्स कमाल किशोर राजू यांनी लिहले आहे. आर्य शर्मा याने संगीत दिले आहे. तर आशिष सत्यार्थी यांनी या गाण्याला दिग्दर्शन केले आहे. या गाण्याला केवळ 7 दिवसातच 49 लाख पेक्षाही व्ह्यूज मिळाले आहे. हे एक रोमँटिक गाणे आहे, ज्यात खेसारी लाल आपल्या सहकलाकारासोबत रोमान्स करताना दिसत आहे.

गाण्याला प्रदर्शित करण्याआधीच 8 मार्च ला त्याचे ‘होली मे साधू आया है’ गाणे रिलीझ झाले होते. हे गाणे देखील खूप कमी कालावधीत व्हायरल झाले होते. होळी हा सण जवळ आल्यामुळे त्याच्या गाण्यांना खूपच मागणी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ये हुई ना बात! तृतीयपंथी पूजाला घरी बोलवून अंकिताने केला आई- वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा, लावले जोरदार ठुमके

-खास मैत्रिणीच्या लग्नात आलीयाचा ‘गेंदा फूल’वर डान्स, गर्ल्स गँगबरोबर लावले जोरदार ठुमके

-पाण्यात आग लागताना कधी पाहिली आहे का? नसेल तर हा पाहा नेहा धुपियाचा जबराट व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.