लय भारी! जस्टिन बीबरच्या गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके, डान्स बघून चाहते घायाळ

Dancer Sapna Chaudhari dance on English song, video get viral


डान्सर सपना चौधरी जेव्हा केव्हा स्टेजवर येते, तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष बघण्यासारखा असतो. तिच्या दमदार डान्सने ती सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने एक शो दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांकडून खूपच पसंती मिळत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहले की, “तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. माझे कुटुंब तुम्ही सगळे आहात, जे माझ्यावर एवढे प्रेम करतात. मी तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे.”

ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते, त्यामुळे ती तिच्या फॅन्ससोबत नेहमीच जोडलेली असते. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की, ती केवळ लाईव्ह शोमधून नाही, तर सोशल मीडियाद्वारे देखील सगळ्यांना तिच्या प्रेमात पडते.

महिला दिनाच्या दिवशी तिचे ‘गुंडी’ या गाण्यासोबत आणखी एक गाणे रिलीझ झाले आहे. ज्या गाण्याला सुपरहिट गायिका रेणुका पवारने आपला आवाज दिला आहे. या गाण्यात सपना धाकड अंदाजात दिसत आहे. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसोबत दोन हात कसे करायचे याबाबत ती सांगत आहे.

हे गाणे 9 मार्चला रिलीझ झाले आहे. या सोबतच तिचे ‘पायल चांदी का’ हे गाणे देखील रिलीझ झाले आहे. या गाण्याला अमन जाजी यांनी म्युजिक दिले आहे, तर मुकेश जाजी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

नुकतेच सपनाला एका मोठ्या बजेटची चित्रपटाची ऑफर आली आहे. ती लवकरच भोजपुरी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार दिनेश लाल यादव याच्यासोबत ‘मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. ब्रजेश मौर्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ये हुई ना बात! तृतीयपंथी पूजाला घरी बोलवून अंकिताने केला आई- वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा, लावले जोरदार ठुमके

-खास मैत्रिणीच्या लग्नात आलीयाचा ‘गेंदा फूल’वर डान्स, गर्ल्स गँगबरोबर लावले जोरदार ठुमके

-पाण्यात आग लागताना कधी पाहिली आहे का? नसेल तर हा पाहा नेहा धुपियाचा जबराट व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.