पटौदी घराण्याचा छोटा नवाब पुन्हा एकदा चर्चेत, गोंडस फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

bollywood saba ali khan share cute pictures of taimur ali khan


बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री करीना कपूर खानने काही दिवसांपूर्वी तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. असे असूनही तैमुर अली खानची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. नुकतेच, तैमुरची आत्या सबा अली खानने या छोट्या नवाबाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तैमुर इतका गोंडस दिसत आहे की, तैमुरची स्तुती करण्यापासून तुम्हीही स्वत: ला रोखू शकणार नाही.

सबा अली खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून चिमुकल्या तैमुर अली खानचे अनेक फोटो शेअर केले आहेत. सबाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘टिम स्टाईल.. माझी जान, मी तुझ्यावर कायम प्रेम करते.’

पहिल्या फोटोत तैमुर आई करीना कपूरसोबत मस्ती करताना दिसत आहे. त्याचवेळी दुसर्‍या फोटोमध्ये तैमुरच्या गालावर रंग लागलेला दिसत आहे. तिसऱ्या फोटोत तैमुरचा गोंडस अंदाज पाहायला मिळाला. सबाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी तैमुरचे तोंडभरून कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खानने लाडक्या तैमुरचा गोंडस फोटो शेअर केला होता. तैमुर या फोटोत अगदी आईसारखाच पाउट देताना दिसला. करीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा गोंडस फोटो शेअर करत लिहिले की, ‘तू माझ्यासारखा आहेस म्हणून किंवा माझ्यासारखा पाउट देतो म्हणून नव्हे, परंतु तू माझा व्हॅलेंटाईन आहेस आणि तूच माझ्या हृदयही आहेस!”

सैफ अली खानची बहीण सबा लहानपणापासूनच लाईमलाईटपासून दूर आहे. इतर स्टार किड्स प्रमाणेच सबा कधीही चर्चेत नव्हती. परंतु गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहायला लागली आहे. फोटो शेअर करुन ती आपली उपस्थिती दर्शवते. ती सतत इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सबा अली खान अभिनयाच्या दुनियेपासून दूर आहे. ती ज्वेलरी डिझायनिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्ड अभिनेत्री निया शर्मा घालतेय मैत्रिणीसोबत राडा!! भर रस्त्यावर शूट केलेल्या व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद

-बॉलिवूडच्या गाण्यांची देशाबाहेरही जादू कायम! हिंदी गाण्यावरील हॉलिवूड मॉडेलचा डान्स व्हायरल

-दिशा पटानीचा किक मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘टायगर श्रॉफच्या संगतीचा परिणाम’


Leave A Reply

Your email address will not be published.