कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

Kannad actress Mayuri kyatri will deliver a baby soon, her pregnancy photoshoot viral on Instagram


कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘मयुरी क्यातरी’ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असताना दिसत आहे. तिच्या अनेक गोष्टी ती प्रेक्षकांसोबत शेअर करत असते. कन्नड चित्रपटसृष्टीत तिने अनेक चित्रपटात काम करून आपली छाप पाडली आहे. तिचा जन्म 11 जुलै 1995 मध्ये कर्नाटकमध्ये झाला होता. कन्नडमधील ‘कृष्णा लीला’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने 12 जून 2020 रोजी अरुण राजू याच्यासोबत लग्न केले. आणि आता ती तिच्या प्रेग्नंन्सीमुळे चर्चेत आहे.

मयुरी ही पहिल्यांदाच आई बनणार आहे, त्यामुळे येणाऱ्या बाळासाठी ती खूपच उत्सुक आहे. याआधी तिने तिच्या प्रेग्नंन्सीबद्दल माहिती दिली आहे. मंगळवारी (8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर तिने एक फोटोशूट केले आहे. त्या फोटोची झलक तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिने पारंपरिक पद्धतीचा पोशाख परिधान केला आहे.

मयुरीने नुकताच एका मुलाखत दिली होती. त्यात तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. तिने तिची डिलिव्हरी डेट देखील माध्ममांना सांगितली होती. तिने सांगितले की, तिला 12 मार्च ही तारीख दिली होती.परंतु डॉक्टरांच्या अंदाजाने आता कोणत्याही वेळी माझी डिलिवरी होऊ शकते. मयुरीने असे सांगितले की, “मला आता खूपच हेवी फील होत आहे. परंतु मी असा विचार केला की, महिला दिन साजरा करण्यासाठी एक फोटोशूट करूयात.”

यानंतर ती म्हणाली की, “माझ्या प्रेग्नंन्सीचा प्रवास खूपच वेगळा आहे. पहिले दिवस खूप चांगले गेले. पण आता जसजशी डिलिव्हरीची डेट जवळ येतेय तसतसे मला खूपच हेवी फील होत आहे. मी आता फक्त माझ्या बाळाच्या येण्याची वाट बघत आहे.”

आता काहीच दिवसात मयुरी एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. तिने सांगितले की, “या शेवटच्या आठवड्यात मला नरम मालिश आणि सलून सर्व्हिस मिळत आहे. मी माझ्या येणाऱ्या बाळासाठी त्याची रूम तयार करून ठेवली आहे, त्याच्यासाठी कपडे देखील आणले आहेत. याआधी मी माझ्या बहिणीला खूप हसायची. तिने मला एकदा सांगितले होते की, प्रेग्नंन्सी दरम्यान खूप वाईट स्वप्न पडतात. पण मला आता तिच्या या गोष्टी पटतात. मला असे स्वप्न पडले होते की, माझ्या बाळाची डिलिवरी कारमध्ये किंवा घरात झाली आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मिका सिंगच्या हिंदी गाण्यावर थिरकली खेसारी आणि शिल्पीची जोडी, व्हिडिओला २ महिन्यातच ४ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर

-बोल्ड अभिनेत्री निया शर्मा घालतेय मैत्रिणीसोबत राडा!! भर रस्त्यावर शूट केलेल्या व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.