बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यांच्या पत्नींना तुम्ही कधी पाहिलंच नसेल, सौंदर्याच्या बाबतीत नादच नाय.! पाहा फोटो

बॉबी देओलची पत्नी इतकी सुंदर आहे की, ती अनेक अभिनेत्रींना सौंदर्यात मात देऊ शकते. मात्र, ती नेहमीच चंदेरी दुनियेच्या झगमाटापासून दूर राहते. वाचा अशाच व्यक्तींबद्दल...


बॉलिवूड म्हणजे स्वप्नांची चंदेरी दुनिया, अनेकांना या दुनियेचा आणि कलाकारांचा खूप हेवा वाटत असतो. याचे कारण म्हणजे, सदर कलाकारांचे आलिशान जीवन, सतत आजूबाजूला असणारा चाहत्यांचा गराडा, मीडिया, फोटोज या सर्व गोष्टींमुळे अनेक लोकं या जीवनाला भुलतात.

मात्र, या क्षेत्रात असेही काही लोक आहेत जे बॉलिवूडशी संबंधीत असूनही या चंदेरी आणि आभासी दुनियेपासून दूर राहतात. आज या लेखात आपण अशा काही लोकांची ओळख करुन घेणार आहोत, ज्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नी आहेत. मात्र, त्या नेहमीच मीडिया आणि लाईमलाईट पासून दूर असतात.

  • जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचल :

बॉलिवूडमधला मोस्ट हँडसम आणि फिट अ‌ॅक्टर म्हणून जॉन अब्राहम ओळखला जातो. वयाच्या पन्नाशीला पोहोचलेला जॉन अजूनही फिट आहे. त्याने २०१४ मध्ये प्रिया रुंचल सोबत खासगी समारंभात लग्न केले. प्रिया आणि त्यांची भेट एका जिममध्ये झाली होती.

John Abraham & Priya Runcha
John Abraham & Priya Runcha

प्रिया एक बँकर असून तिला लाईमलाईटमध्ये यायला बिलकुल आवडत नाही. याबद्दल जॉनने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, मी जेव्हा माझ्या पत्नीसोबत असतो तेव्हा मला आमच्या आजूबाजूला कोणी असेलेलं बिलकुल आवडत नाही.

इम्रान हाश्मी आणि परवीन सहानी :

बॉलिवूडमधला सिरीयल किसर म्हणून ओळखला जाणारा इम्रान बॉलिवूडमध्ये येण्याआधीपासूनच परवीन सोबत नात्यात होता. सहा वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना अयान नावाचा एक मुलगा देखील आहे. परवीन हि एक शिक्षिका असून ती नेहमीच चंदेरी दुनियेच्या झगमाटापासून दूर राहते.

Emraan hashmi with wife
Emraan hashmi with wife

बॉबी देओल आणि तान्या देओल :

बॉबी देओल-तान्या देओल यांच्या लग्नाला २० वर्षाहून अधिक काळ झाला आहे. तान्या देओल ही इतकी सुंदर आहे की ती अनेक मोठ्या अभिनेत्रींना सौंदर्यात मात देऊ शकते.

सन १९९६ मध्ये बॉबी आणि तान्याने लग्न केले. त्यांची पहिली भेट मुंबईच्या एक हॉटेलमध्ये झाली होती.

Bobby Deol with Wife Tania Deol
Bobby Deol with Wife Tania Deol

विवेक ओबेरॉय आणि प्रियंका अल्वा:

विवेकने कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांच्या मुलीशी २०१० मध्ये लग्न केले. आज विवेक आणि प्रियांका एका मुलाचे आणि मुलीचे आई वडील आहे. प्रियांका सुद्धा नेहमीच लाइमलाईटमध्ये येण्यापासून स्वतःला वाचवत असते.

Vivek Oberoi And Priyanka Oberoi
Vivek Oberoi And Priyanka Oberoi

नील नितिन मुकेश आणि रुक्मिणी सहाय :

नील नितिन मुकेशने फेब्रुवारी २०१७ मध्ये रुक्मिणी सोबत लग्न केले. रुक्मिणीचा बॉलिवूडसोबत कोणताच संबंध नाहीये. रुक्मिणीने तिचे करियर म्हणून एव्हिएशन सेक्टरची निवड केली आहे. नील आणि रुक्मिणी यांना एक गोंडस मुलगी आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.