Wednesday, May 6, 2026
Home बॉलीवूड ‘तुम्बाड 2’ या चित्रपटात होणार या लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री

‘तुम्बाड 2’ या चित्रपटात होणार या लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री

अनेक चित्रपट असे आहेत की ते प्रंचड गाजले आणि त्यामुळे त्याचे अनेक भाग हि निघाले तर असाच एक चित्रपट म्हणजे तुम्बाड हा चित्रपट प्रंचड गाजला आणि आता या तुम्बाड 2 बाबत चर्चा सुरु आहे. हा चित्रपट काही दिवसांनी प्रदर्शित होईल पण या तुम्बाड 2 मध्ये कोणते कलाकार दिसणार या बाबत सध्या सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. तर आता अश्यातच निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याची घोषणा केली. 

सोहम शाहचा ‘तुम्बाड 2’ मध्ये आता  अलीकडे, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि नयनतारा यांसारख्या मोठ्या नावांचा चित्रपटासाठी विचार केला जात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या तीन नावांवर चर्चा सुरू असतानाच चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आले आहे. ज्यानुसार आलिया भट्ट या बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या कलाकारांमध्ये सामील होत आहे. हा तुम्बाड चित्रपट अनेक दिवसांपुर्वी रीलीज झाला असला तरी या चित्रपटाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. हा एक भय चित्रपट आहे.

एक मिडिया वृत्तानुसार अभिनेत्री आलियाने (aliya)तुम्बाड 2 मध्ये काम करण्यास होकार दिला आहे. तर या चित्रपटात तिची भुमिका ही एका दमदार पात्र साकारण्याची असेल. तर तिने याचे त्यासाठी सुमारे 20 दिवसांपासून चित्रीकरण सुरू केले आहे. ही एक कॅमिओ भूमिका आहे. तर  तुम्बाड 2  चे दिग्दर्शक आदेश प्रसाद हे आहेत. तर हा चित्रपट साधारणपणे 3 डिसेंबर 2027 रोजी येत आहे. तसेच या चित्रपटात सोहम शाह आणि नवाझुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘मी आज त्यांच्यामुळे इथे उभा आहे’ मेट गाला 2026 डेब्यूनंतर करण जोहरने या सुपरस्टारला दिलं श्रेय

हे देखील वाचा