Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड सिनेतारकांना नाचवणारा प्रभुदेवा आता प्रेक्षकांना घाबरवणार! नवीन चित्रपटातील सायको लूक होतोय जबरदस्त व्हायरल, पाहा व्हिडिओ

सिनेतारकांना नाचवणारा प्रभुदेवा आता प्रेक्षकांना घाबरवणार! नवीन चित्रपटातील सायको लूक होतोय जबरदस्त व्हायरल, पाहा व्हिडिओ

भारताचा ‘मायकल जॅक्सन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभुदेवा अभिनेता म्हणून ओळख निर्माण करू शकला नाही. आपल्या नृत्याने भारतातील नृत्यवेड्यांना जणू त्याने वेड लावले होते. आपल्या करिअरची सुरुवात त्याने डान्स कोरिओग्राफर म्हणून केली होती. आपल्या डान्सच्या जोरावर तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्यानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक देखील झाला. परंतु तो आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर समोर येणार आहे. गंमत म्हणजे त्याच्या या भूमिकेत त्याचे असे लुक्स आहेत की, ज्यामुळे आपल्याला त्याला ओळखणे कठीण होणार आहे.

प्रभुदेवाच्या नुकताच एका नवीन चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अवघ्या काही तासातच त्याला लाखोंच्या घरात व्ह्यूज देखील मिळाले. मोठ मोठ्या तारकांना नाचवणारा प्रभुदेवा आता प्रेक्षकांना घाबरवणार आहे. त्याचा हा चित्रपट म्हणजेच ‘बघिरा’. यामध्ये तो एका सायको किलरच्या भूमिकेत दिसणार आहे.

डान्स आणि कॉमेडी या व्यतिरिक्त त्याला आपण वेगवेगळ्या रुपात पाहणार आहोत. कधी डॉक्टर, कधी वकील, तर कधी डान्सर या अनेक रुपात त्याला येथे पाहणे औसुक्याचे ठरेल. काही रुपात तर तो ओळखायला देखील येणे मुश्किल ठरणार आहे. आपली ओळख लपवून चित्रपटातील अनेक लोकांना ठार मारणार असल्याचे या टिझरवरून लक्षात येते. प्रभुदेवाचा हा अवतार चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. काही दिवसापासून चर्चेत असणारा त्याचा हा चित्रपट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

प्रभुदेवासोबतच दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि अमायरा दस्तूर हे देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. अमायराशिवाय तो इतर अभिनेत्रींसोबत देखील या चित्रपटात रोमांस करताना दिसणार आहे. अदाविक रविचंद्रन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सोबतच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची अद्यापही माहिती समोर आलेली नाही.

प्रभू देवा आज बॉलिवूड आणि दक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरियोग्राफर असून त्याने ‘रावडी राठोड’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘ॲक्शन जॅक्शन’, ‘राजकुमार’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी तो ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ या सिनेमात दिसला होता. आपल्या फिल्मी करियरमध्ये त्याने तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषिक चित्रपटात काम केले आहे. शिवाय शंभरपेक्षा अधिक चित्रपटात नृत्य दिग्दर्शनाचे काम त्याने केले आहे. त्यासाठी त्याला पुरस्कार देखील मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पाहा व्हिडीओ- बहुचर्चित ‘रुही’ सिनेमातील पहिले गाणे रिलीझ, ‘पनघट’ गाण्याला चार तासांत लाखो हिट्स

-‘पावरी हो रही है’च्या रंगात रंगला शाहिद कपूर! मजेशीर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

-अगं ताई, तो प्राईजचा टॅग तरी काढ!! अभिनेत्रीने लेबल न काढताच घातला ड्रेस, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पाहा व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा