रुपेरी पडद्यावर पुन्हा दिसणार छत्रपती शिवरायांचे जाणते रुप; ‘हा’ अभिनेता साकारणार महाराजांची व्यक्तिरेखा?

Shahid Kapoor To Play Chhatrapati Shivaji Maharaj In A Film Kabir Singh Team Speculation


बॉलिवूडमध्ये आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्यांमध्ये सुपरस्टार शाहिद कपूरच्या नावाचाही समावेश होतो. सन २०१९ मध्ये आलेला त्याचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता वृत्त येत आहे की, शाहिद पुन्हा एकदा वेगळे काहीतरी करणार आहे. तो तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एका चित्रपटात झळकताना दिसू शकतो. तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

शाहिद कपूर दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत?
माध्यमातील वृत्तानुसार, शाहिद आपल्या कबीर सिंग चित्रपटाच्या टीमसह या मोठ्या प्रोजेक्टबाबत चर्चा करत आहे. कबीर सिंगचे निर्माता अश्विन वर्दे यांनीच या प्रोजेक्टवर काम करण्याचे मन बनवले आहे. अशामध्ये ते टॉलिवूडची मोठी प्रॉडक्शन कंपनी ‘लायका प्रॉडक्शन्स’सोबत हात मिळवू शकतात. जर ही बातमी खरी ठरली, तर ऐतिहासिक चित्रपटात झळकण्याची शाहिदची ही दुसरी वेळ असेल.

यापूर्वी शाहिद संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात राजा महारावल रतन सिंग यांच्या भूमिकेत दिसला होता. त्याची ही भूमिका चाहत्यांना खूपच भावली होती. त्याच्या या भूमिकेने सर्वांचे मन जिंकले होते.

अशामध्ये आता शाहिदने मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तर चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा असतील, यामध्ये शंकाच नाही. सर्वांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर श्रद्धा आहे, त्यामुळे जर महाराजांवर चित्रपट बनला, तर प्रेक्षकांची बारीक नजर असणार आहे. कारण अशावेळी कोणत्याही प्रकारची चूक खपवून घेतली जात नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात अभिनेता शरद केळकर याने महाराजांची भूमिका साकारली होती.

अशीही बातमी आहे की, सुपरस्टार रितेश देशमुखही आपल्या प्रॉडक्शन हाऊसमार्फत या खास चित्रपटावर काम करत आहे. तसेच अशाही काही बातम्या आहेत की, सुपरस्टार सलमान खानलाही या भूमिकेत घेण्याची तयारी केली जात आहे.

शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो आपल्या ‘जर्सी’ या आगामी चित्रपटात क्रिकेटपटूची भूमिका साकारणार आहे. त्याने आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पदार्पणाची तयारीही केली आहे. असे म्हटले जात आहे की, शाहिदने ऍमेझॉन प्राईम व्हिडिओसोबत मोठा करार केला आहे आणि तो लवकरच याची घोषणा करू शकतो.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: ५ वर्षे रिसर्च करून बनवलेला दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने केला टिझर शेअर

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.