बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

Actress Uravshi Rautela Cut 10 KG Onion On Her Birthday Video Goes To Viral


सेलिब्रिटी मंडळी आपला वाढदिवस कोणत्या पद्धतीने साजरा करतील, याबद्दल काही सांगता येत नाही. कधी ते मोठी पार्टी देतील, तर कधी आपल्या जोडीदारासोबत स्पेशल डेटवर जातील. पण यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केलाय, प्रसिद्ध अभिनेत्री ‘उर्वशी रौतेला’ हिने. खरं तर उर्वशी रौतेला आपल्या स्टायलिश अंदाज, महागडी ज्वेलरी आणि भन्नाट डान्ससाठी ओळखली जाते. तिने आपल्या वाढदिवसाचाही एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटवर आग लावत आहे.

अभिनेत्री उर्वशीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “माझ्या वाढदिवशी १० किलो कांदे कापून घेतल्याबद्दल धन्यवाद. फक्त आपण हे करू शकता @cznburak. एके दिवशी मी कांद्यानाही रडवणार आहे.

या व्हिडिओमध्ये उर्वशी  एका व्यक्तीसोबत कांदे कापताना दिसतेय. त्या व्यक्तीला तिने आपल्या कॅप्शनमध्येही टॅग केले आहे. या व्हिडिओत तिचे हावभाव कमालीचे दिसत आहेत. व्हिडिओची लोकप्रियता यावरून माहिती पडते की, आतापर्यंत या व्हिडिओला एका तासात ७ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

उर्वशीच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सध्या उर्वशी मोहन भारद्वाज यांच्या ‘ब्लॅक रोझ’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट असेल, जो प्रसिद्ध साहित्यकार विल्यम शेक्सपियरचे नाटक ‘द मर्चंट ऑफ वेनिस’वर आधारित आहे. यापूर्वी ती ओटीटीवर रिलीझ झालेल्या तिच्या ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटात झळकली आहे.

तिचे नुकतेच एक व्हिडिओ गाणे ‘वो चांद कहां से लाओगी’ रिलीझ झाले होते. या गाण्यात ती टीव्ही स्टार मोहसिन खानसोबत दिसली होती. उर्वशीने सनी लिओनीसोबतच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

तिने सनी देओलसोबत ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ

-टिशू झाला इशू! गर्दीचा फायदा घेऊन दिपीकाची पर्स खेचण्याचा घडला प्रकार, घटनेचा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल

-याला म्हणतात विषय खोल! खेसारी-काजलच्या गाण्याने तोडले सगळे विक्रम, २६ कोटी हिट्स आले पहिल्या क्रमांकावर


Leave A Reply

Your email address will not be published.