व्हिडिओ: ५ वर्षे रिसर्च करून बनवलेला दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने केला टिझर शेअर

Muddy Movie Teaser Malyalam Film Based On Mud Racing Directed By Dr Pragabhal Staring Yuvan And Ridhaan Krishna


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. ते नेहमी काहीतरी वेगळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मागील काही वर्षांमध्ये आपण पाहिले आहे की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील वेगवेगळ्या भाषेतील अनेक चित्रपट रिलीझ झाले. त्यांच्या यशावर चर्चा केली जाते, परंतु त्यांनी मांडलेल्या विषयांनी सर्वांनाच प्रभावित केले. अशातच आता या चित्रपटसृष्टीतील आणखी एक नवीन चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीझ झाला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून ‘मडी’ हा चित्रपट येत आहे. मडी या शब्दाचा मराठी अर्थ चिखल असा होतो, आणि यातुनच चित्रपटाच्या विषयाचे संकेत मिळतात. खरं तर मडीमध्ये ऑफ रोड रेसिंगच्या विषयाला हात घातला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. प्रगाभल यांनी केले आहे. त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती प्रेमा कृष्मादास यांनी केली आहे. हा चित्रपट तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांव्यतिरिक्त हिंदीतही रिलीझ केला जाणार आहे.

या चित्रपटासाठी डॉ. प्रगाभल यांनी ५ वर्षे रिसर्च केला आहे. यानंतर वेगवेगळ्या टीममधील स्पर्धेवर या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. विशेष म्हणजे, ऑफ रोड रेसिंगशी निगडीत सर्व स्टंट मुख्य कलाकारांनी स्वत: केले आहेत. या चित्रपटाचे स्टार कास्टची निवड करताना या गोष्टीवर भर देण्यात आला की, यामध्ये अशा स्टार्सना कास्ट केले पाहिजे, जे स्टंटच्या बाबतीत धाडसी असतील. त्याचबरोबर त्यासाठी ते महत्त्वाचा वेळ आणि एनर्जी देऊ शकतील, जेणेकरून डुप्लीकेटचा वापर होणार नाही. विशेष म्हणजे कलाकारांना तब्बल २ वर्षे ट्रेनिंग देण्यात आली होती.

या चित्रपटाचे लोकेशन निवडण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागला. कारण या स्पोर्ट्स फिल्ममध्ये विज्युअल एक्सपीरियंससाठी अशा लोकेशनची गरज होती, ज्यामुळे थ्रिल निर्माण होऊ शकेल. चित्रपटाचा टिझर अभिनेता अर्जुन कपूर यांने शेअर केला आहे.

या चित्रपटात युवान, रिधान कृष्णा, अनुषा सुरेश आणि अमित शिवदास नायर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत केजीएफ फेम रवी बसरूर यांनी तयार केले आहे. त्यांचे हे मल्याळम पदार्पण आहे. सिनेमॅटोग्राफी केजी रतीश यांनी केली आहे. यापूर्वी विजय सेतुपतिनेही चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते, ज्याला २ मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ

-टिशू झाला इशू! गर्दीचा फायदा घेऊन दिपीकाची पर्स खेचण्याचा घडला प्रकार, घटनेचा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.