Thursday, March 28, 2024

‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल! ‘डिअर जिंदगी’पासून ते ‘पीकू’पर्यंत ‘हे’ चित्रपट शिकवतात स्वतःवर प्रेम करायला

‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमाचा खुलासा करण्याचा दिवस असतो. अनेकांना या दिवशी त्यांचं प्रेम. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सगळे कपल एकमेकांना भेटतात. गिफ्ट देतात. एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतात. आता प्रत्येकाकडे या दिवशी जोडीदार असावाच असं काही गरजेचं नाही. जरी तुम्ही सिंगल असाल, तरी देखील तुम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू शकता. आता बऱ्याच जणांना ही गोष्ट पटणार देखील नाही की, सिंगल असताना हा दिवस कसा काय सेलिब्रेट करायचा?, परंतु बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत की, ज्यात कलाकार त्यांचं सिंगल लाईफ एन्जॉय करताना दिसत आहेत.

क्वीन
कंगना रणौत हिच्या सुपरहिट चित्रपटांमधील ‘क्वीन’ हा एक हिट चित्रपट आहे. स्वतःवर कसं प्रेम करायचं ही गोष्ट या चित्रपटातमधून बघायला मिळते. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘विकास बहल’ यांनी केले आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट खूपच हिट झाला होता.

डिअर जिंदगी
डिअर जिंदगी या चित्रपटात 20 वर्षाची कायरा म्हणजेच आलिया भट्ट ही आत्मनिर्भर होण्यासोबतच स्वतःच्या करिअरवर फोकस करणारी मुलगी आहे. अनेक समीक्षकांनी या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे कौतुक देखील केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा एका मेंटोरच्या भूमिकेत आहे.

मेरी प्यारी बिंदू
या चित्रपटात मुख्य भूमिकेत आयुषमान खुराणा आणि परिणीती चोप्रा आहे. मेरी प्यारी बिंदू हा चित्रपट बॉलिवूडमधील त्या चित्रपटांपैकी एक आहे, जो कधी आनंदाने संपला आहे. म्हणूनच प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडतो.

प्यार का पंचनामा
प्यार का पंचनामा हा एक असा चित्रपट आहे, जो सांगतो की, आपल्याला सिंगल का राहिलं पाहिजे. संपूर्ण चित्रपटात कॉमेडीचा तडका लावलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपटात खूपच आनंदाने पहिला.

ए दिल हैं मुश्किल
करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या ‘ए दिल हैं मुश्किल’ या चित्रपटात ऐश्वर्या राय, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट त्या व्यक्तींसाठी आहे, जे म्हणतात की मुलगा आणि मुलगी कधी मित्र नाही बनू शकत. एकतर्फी प्रेमाची ताकद या चित्रपटमधून दिसून येते.

पीकू
शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केलेल्या पीकू या चित्रपटात दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि इरफान खान हे मुख्य भूमिकेत दिसून येतात. एका बाप आणि मुलीच्या जोडीला केवळ समीक्षकांनी नाही, तर प्रेक्षकांनीदेखील खूप प्रेम दिले.

दिल चाहता है
आमिर खान, अक्षय खन्ना, सैफ अली खान यांचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्या मित्रांच्या ग्रुपला गोव्याला जायची ईच्छा होते. व्हॅलेंटाईन डे दिवशी सिंगल व्यक्तींसाठी हा चित्रपट अत्यंत उत्कृष्ट आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ

हे देखील वाचा