अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ


बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा एकमेकांवर प्रेम दाखवण्याची संधी गमावत नाहीत. सोनम कपूर सध्या पती आनंद अहुजासह भारतापासून दूर इंग्लंडमध्ये राहत आहे. परंतु बर्‍याचदा ती चाहत्यांमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने सोनम कपूरने पती आनंद अहुजासोबत एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला जबरदस्त लाईक्स मिळाले असून चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडिओमध्ये ती चालू ट्रेनमध्ये पती आनंद अहुजाला किस करताना दिसली आहे. सोनम कपूरचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

आनंद अहुजाबरोबरचा व्हिडिओ शेअर करताना सोनमने लिहिले, “ग्लासगोमध्ये माझ्याबरोबर 6 पैकी 5 आठवडे घालवण्यासाठी माझ्या अप्रतिम पतीचे मनापासून आभार. शूटिंगनंतर ते दररोज माझ्याकडे परत यायचे. लंडनमध्ये घरून काम करणे त्यांच्यासाठी सोपे झाले असते. परंतु तरीही त्यांनी माझ्याबरोबर इथेच राहायचे ठरवले. धन्यवाद, मी तुमची प्रशंसा करते आणि मी तुमच्यावर खूप प्रेम करते.”

सोनम कपूरचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सन 2018 मध्ये सोनम आणि आनंदने शीख रीतीरिवाजानुसार लग्न केले होते. आता त्यांच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत.

सोनम कपूरने ‘प्रेम रतन धन पायो’, ‘नीरजा’, ‘खूूबसुरत’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘रांझना’, ‘पॅड मॅन’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.