व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला


जगातली सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीमधील एक म्हणून बॉलिवूडला ओळखले जाते. बॉलिवूडने नेहमीच ऍक्शन चित्रपटांपेक्षा रोमँटिक सिनेमांना जास्त प्राधान्य दिले. प्रेक्षकांनीही या सिनेमांना खुल्या हातांनी स्वीकारले. हिंदी सिनेमांमधून अनेक अविस्मरणीय प्रेम कथा आपण पाहिल्या आणि त्या कथा या इंडस्ट्रीमध्ये अजरामर झाल्या. नुकताच ‘व्हॅलेंटाइन डे’ पार पडला. त्यानिमित्ताने जाणून घेऊया अशाच काही सिनेमांबद्दल…

मुगल-ए- आझम
सन १९६० मध्ये आलेला ‘मुगल-ए- आझम’ हा सिनेमा आजही नव्या- जुन्या सर्वच पिढ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. या सिनेमाचे संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर रेंगाळतात. ‘अनारकली’ आणि ‘शहजादे सलीम’ यांची सुंदर आणि अपूर्ण प्रेमकथा, सिनेमा बघताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणते. सिनेमातील सर्व कलाकार आणि सिनेमाचा भव्य दिवा सेट आजही चर्चेचा विषय आहे. १४ वर्ष इतका मोठा काळ हा सिनेमा तयार व्हायला लागला. मात्र, जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा एवढा कालावधी सिनेमा पूर्ण करायला का लागला याचे उत्तर सर्वांना मिळाले, आणि सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून या १४ वर्षांचे सार्थक झाले.

दीड कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने त्याकाळी ११ कोटींची कमाई केली होती. मुघल साम्राज्याचा शहजादा सलीमचे त्याच्या महालात नाचणाऱ्या अनारकलीवर प्रेम जडते. पण सलीमच्या वडिलाना या दोघांचे नाते मान्य नसते. प्रेमाविरुद्ध अकबर आपल्याच मुलाविरोधात युद्धाची घोषणा करतो. अशी या सिनेमाची कथा आहे.

मसान
सन २०१५ साली आलेला ‘मसान’ हा सिनेमा अतिशय वेगळा प्रेमकथा असणारा सिनेमा होता. या एकाच सिनेमात अनेक प्रेमकथा दाखवल्या गेल्या. या सिनेमातून बॉलिवूडला विकी कौशलसारखा दमदार अभिनेता मिळाला. या सिनेमात विक्की ऊर्फ दीपक चौधरी घाटावर प्रेत जाळण्याचे काम करत असतो, तर श्वेता ऊर्फ शालू गुप्ता एका चांगल्या कुटुंबातून असते. दोघांची परिस्थिती वेगळी असूनही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. काही काळाने दुर्दैवाने एका अपघातात शालूचे निधन होते, आणि योगायोगाने दीपककडे तिचे प्रेत जाळण्यासाठी येते.

यासोबत रिचा चड्डा ऊर्फ देवी पाठक यांच्या देखील कथा यात दाखवल्या आहेत. एका हॉटेलमध्ये आपल्या प्रियकरासोबत फिजिकल होत असताना पोलिसांकडून पकडली जाते. समाजाच्या भीतीमुळे आणि लाजेपोटी देवीचा प्रियकर त्याच हॉटेलमध्ये आत्महत्या करतो. त्यानंतर देवी आपले संपूर्ण आयुष्य पश्चातापात जगते.

बर्फी
प्रेमाला भाषेचे बंधन नसते असे नेहमी म्हटले जाते. बर्फी या सिनेमाने हे सिद्ध देखील केले. रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा आणि इलियाना डीक्रुझ यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमात बर्फी म्हणजे रणबीर कपूरचे श्रुतीवर (इलियाना डीक्रुझ) प्रेम जडते. मात्र, मुकबधिर असल्याने श्रुतीच्या आईचा या नात्याला नकार असतो, आणि ती श्रुतीचे लग्न दुसरीकडे लावून देते. दुसरीकडे बर्फीच्या वडिलांच्या उपचारासाठी बर्फी बँक लुटतो. त्या दरम्यान चुकीने त्याच्याकडून झिलमिल चॅटर्जीचे (प्रियांका चोप्रा) अपहरण होते. झिलमिल ऍबनॉर्मल असते. काही घटनांनंतर बर्फीच्या आयुष्यात पुन्हा श्रुती येते. मात्र, तेव्हा बर्फीला झिलमिल त्याचे खरे प्रेम असल्याचे जाणवते.

२ स्टेट्स
‘२ स्टेट्स’ सिनेमाच्या कथेसोबतच, गाण्यांमुळे गाजलेला हा सिनेमा पंजाबी मुलगा आणि दक्षिण भारतीय मुलगी यांच्या प्रेमावर आधारित आहे. या सिनेमात अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. कॉलेजमधील प्रेमाचे लग्नात रूपांतर करताना भिन्न परिवाराचा आणि भिन्न संस्कृतींचा अडथळा घरचे लोक निर्माण करतात. मात्र, यातूनही ते वाट काढत आपले प्रेम घरच्यांच्या संमतीने मिळते.

रॉकस्टार
इम्तियाज अली दिग्दर्शित २०११ साली आलेला ‘रॉकस्टार’ हा सिनेमा सुपरहिट झाला होता, आणि एआर रेहमान यांच्या संगीताने सिनेमाला ‘चार चांद’ लावले. साधी मात्र मनाला भिडणारी अपूर्ण प्रेमकथा यात दाखवण्यात आली आहे.

जनार्दनला (रणबीर कपूर) रॉकस्टार व्हायची इच्छा असते. एक हॉटेल चालक त्याला सांगतो की, प्रेमभंग झालेले लोक चांगले रॉकस्टार बनतात. हे ऐकून स्वत: चा प्रेमभंग करण्यासाठी जनार्दन कॉलेजमधील सर्वात सुंदर मुलगी हीरकडे (नरगिस फाकरी) जात तिच्या प्रेमात पडतो. पण तिचे दुसरीकडे लग्न होत असते. हा प्रेमभंग जनार्दनला लोकप्रिय गायक बनतो. काही काळाने हे दोघे पुन्हा जवळ येतात. मात्र, तेव्हा हीरचे वैवाहिक आयुष्य अडसर बनते. जेव्हा जनार्दनला हीरच्या आजाराविषयी समजते, तेव्हा दोघे शेवटचे काही क्षण सोबत घालवतात. यादरम्यान हीरला दिवस जातात आणि त्यामुळे ती कोमात जाते आणि तिचा मृत्यू होतो. हीरचे कुटुंब जनार्दनला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवते.

वीर झारा
सन २००४ साली आलेला ‘वीर झारा’ हा सिनेमा अभिनय, कथा आणि गाण्यांमुळे प्रचंड गाजला. भारतीय एअरफोर्स ऑफिसर असणाऱ्या वीरची (शाहरुख खान) पाकिस्तानी झाराशी (प्रीती झिंटा) भेट होते. अशी काही घटना घडते की, वीर तिला त्याच्या घरी घेऊन येतो. जेव्हा वीर तिला सोडण्यासाठी स्टेशनवर जातो, तेव्हा त्याची झाराचा होणारा नवरा रजा शाजी याच्याशी भेट होते.

लग्नाआधी वीर झाराला पाकिस्तानात घेऊन जातो, जेथे त्याला भारतीय हेर समजून जबरदस्तीने तुरुंगात पाठवतात. दोघांची लव्ह स्टोरी येथे संपते. मात्र, अनेक वर्षांनंतर दोघांची पुन्हा भेट होते. वीरचा खटला लढणारी वकील सामिया दोघांची पुन्हा भेट घडवून आणते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ
-‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त अभिनेत्री अक्षरा सिंगचे नवे गाणे रिलीझ, चाहत्यांकडून मिळतोय उत्तम प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.