प्रियांका चोप्रा ही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणुन ओळखली जाते. अनेक दर्जेदार चित्रपटात तिने काम केले आहे. तिने साकारलेल्या मेरी कोमच्या भूमिकेच सर्वत्र कौतुक झालं होतं. पडद्यावर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मात्र मी ही भूमिका करण्यासाठी तयार नव्हते असा चकित करणारा खुलासा प्रियांका चोप्राने केला आहे.
‘मेरी कॉम’ हा प्रियांका चोप्राच्या (priyanka chopra) संपुर्ण कारकिरर्दितला सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील प्रियांकाच्या भूमिकेच भरभरुन कौतुक झालं होतं. परंतु चित्रपटात प्रियांकाच्या निवडीवर पहिल्यांदा जोरदार विरोधही झाला होता. या भुमिकेसाठी एखाद्या उत्तर-पूर्व भागातील अभिनेत्रीला संधी द्यायला पाहिजे होती असा लोकांचा आग्रह होता. अशी कबुली खुद्द अभिनेत्री प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत बोलताना दिली आहे.
एका मुलाखतीत बोलताना प्रियांकाने सांगितले की, ”जेव्हा मी मेरी कोमची भूमिका करत होते तेव्हा मला खुप संकोच वाटत होता कारण मेरी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. तिने अनेक महिला खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. महत्वाच म्हणजे मी कुठूनही तिच्यासारखी वाटत नाही. ती उत्तर-पूर्व भारतातून आहे, तर मी पूर्व भारतातून आहे. आमची शरिररचना ही एकसारखी वाटत नाही.”
यावेळी पुढे बोलताना ती म्हणाली की, ”खरतर ती भूमिका एखाद्या उत्तर पूर्व अभिनेत्रीला मिळायला हवा होती, मात्र एक कलाकार म्हणून मला या भूमिकेचा मोह झाला होता. कारण मला तिची कथा सांगण्याची संधी मिळणार होती. एक भारतीय महिला आणि खेळाडू म्हणून तिने मला खुप-खूप प्रेरणा दिली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी जेव्हा मला या भूमिकेसाठी आग्रह केला तेव्हा मी तयार झाले.”
भूमिकेसाठी घेतली होती पाच महिने मेहनत…
या भूमिकेबद्दल बोलताना प्रियांकाने सांगितले की, ”मेरी कोमसाठी मी पाच महिने जीवतोड मेहनत घेतली होती. मी मेरीला भेटले, तिच्या घरी तिच्या मुलांसोबत, पतीसोबत वेळ घालवला. मला जवळजवळ पाच महिने खेळाच प्रशिक्षण घ्याव लागल. जे खूप कठीण होतं.”
चित्रपटाला मिळाले होते अनेक राष्ट्रीय पुरस्कार…
या चित्रपटातील प्रियांकाच्या भूमिकेला विरोध झाला असताना प्रदर्शित झाल्यानंतर मात्र चित्रपट यशस्वी ठरला.
मेरी कोमला यासाठी बेस्ट पॉप्युलर फिल्मचा पुरस्कार देण्यात आला, त्याचबरोबर प्रियांका चोप्रालाही तिच्या अभिनयासाठी स्क्रिन अवॉर्ड मिळाला होता.
अधिक वाचा-
–सलमानच्या नावे फेक कॉल्स… भाईजानने दिला ‘हा’ थेट इशारा; वाचा काय घडले?
–दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा