पहिल्याच चित्रपटात स्विमसूट घालून करिश्माने केला होता राडा; ३० वर्षे पूर्ण झाल्यावर अभिनेत्रीकडून फोटो शेअर


बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील एक सुंदर, बिनधास्त आणि एक हुशार अभिनेत्री होती. त्या काळात ती तिच्या फिगरमुळे आणि फिटनेसमुळे खूप चर्चेत होती. करीना कपूर पेक्षा 6 वर्षांनी मोठी असलेल्या करिश्माने तिच्या करिअरची सुरुवात 21 जून, 1991 मध्ये केली होती. तिने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. (30 years complete to prem kaidi film, karishma kapoor share a photo on social media)

त्यावेळी करिश्मा केवळ 16-17 वर्षाची होती. तिच्या या चित्रपटाला आज 30 वर्ष पूर्ण आले आहे. यानिमित्त तिने काही बिनधास्त फोटो शेअर केले आहेत. ज्या फोटो मध्ये तो स्विमिंग सूटमध्ये दिसत आहे. हा फोटो तिच्या या चित्रपटातील आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “प्रेम कैदीचे 30 वर्ष, 17 वर्षाच्या मुलीचा आत्मविश्वास, आभारी आहे.”

करिश्माने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा हा चित्रपट आणि ती खूप चर्चेत होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिला तिच्या लूकवरून आणि गेटअपवरून खूप ट्रोल केले होते. परंतु 1996 मध्ये आलेला ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातील तिचा लूक खूप हिट झाला होता.

‘प्रेम कैदी’ हा चित्रपट तेलुगु चित्रपट ‘प्रेमा खैदी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. ही एक म्युझिकल लव्ह स्टोरी होती. या चित्रपटाचे लेखन मुरली मोहन राव यांनी केले होते. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते. रामा नायडू हे या चित्रपटाचे निर्माते होते. या चित्रपटात हरीश कुमार आणि करिश्मा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाआधी हरीश कुमारने अनेक तेलुगु चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले आहे.

हरीशने 1982 मध्ये आलेला ‘जीवनधारा’ या चित्रपटात बॉलिवूडमध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटात राकेश रोशन, राज बब्बर, अमोल पालेकर, अंवलजीत सिंग आणि सिंपल कपाडिया हे मुख्य भूमिकेत होते. ‘प्रेम कैदी’ हा चित्रपट हरीश कुमारसाठी मुख्य भूमिकेत असणारा पहिला चित्रपट होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती

-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.