भारतीय सिनेसृष्टीत सध्या नवनवीन विषयांवर चित्रपट बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अनेक नवनवीन चित्रपटांची निर्मिती सध्या दिग्दर्शक करत आहेत. अत्यंत कल्पकतेने तयार होणाऱ्या या चित्रपटात बऱ्याचदा निर्मात्याकडून अशा काही चूका होतात ज्यामुळे चित्रपट फ्लॉप होण्याचीही भिती असते. मात्र या चूका प्रत्येकाच्या लक्षात येतातच असं नाही. असाच काहीसा प्रकार सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या ‘पुष्पा’ मधेही झालाय, काय आहेत या चूका चला जाणून घेऊ.
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट सर्वत्र लोकप्रिय ठरत आहे. कमाइचे नवनवीन विक्रम या चित्रपटाने तयार केले आहेत. देशातील अनेक भागात सिनेमागृहे बंद असूनही या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. आत्तापर्यंत हा चित्रपट कन्नड, मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये तुफान लोकप्रिय ठरला आहे. पुष्पाला दर्जेदार समजणाऱ्या प्रेक्षकांच्या नजरेला मात्र यामधल्या चूका लक्षात आल्याच नाहीत
या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून झालेली पहिली चुक म्हणजे, एका सीनमध्ये पुष्पाचा खास दोस्त केशवला कारचा दरवाजाही उघडता येत नाही, अस दाखवल आहे मात्र त्याच्याच पुढच्या सीनमध्ये तो नवी कोरी मारुती व्हॅन चालवताना दिसत आहे. आता ज्या माणसाला गाडीचा दरवाजा ही उघडता येत नव्हता तो गाडी कशी काय चालवु शकतो, हा विचार निर्मात्यांच्या मनात आलाच नाही, आहे की नाही कमाल..
आता चित्रपटातला आणखी एक सीन आठवा ज्यामध्ये ‘पुष्पा’ पोलिंसापासून वाचण्यासाठी आपला ट्रक एका खड्ड्यात पाडतो, हा खड्डा ट्रक पडलेला खड्डा रस्त्याच्या कडेलाच आहे, तरीही पोलिसांना कसा काय दिसला नाही बुवा, बर खड्डा दिसला नाही ते नाही पण हा संपूर्ण रस्ता कच्चा आहे, म्हणजे त्यावर पुष्पाच्या ट्रकच्या टायरचे निशाण तरी उमटले असतील, आता ते सुद्धा पोलिसांना दिसले नाहीत म्हणजे नवलच आहे. म्हणूनच ते ट्रक न शोधता थेट त्याला गाडीत नेतात. आता ही सुद्धा चूक तुमच्या लक्षात आली नसेल.
चित्रपटात एका सीनमध्ये पुष्पा श्रीनूचा मेहूण्याला म्हणजे मोगलिसला पाण्यामध्ये मारताना दिसत आहे. सोबतच तो पाण्यात मोटारसाइकल सुद्धा फिरवत आहे. मात्र त्या नदीत मोठेमोठे दगडसुद्धा आहेत. आता एवढे मोठे दगड असताना तो पाण्यात गाडी गोल गोल कशी फिरवू शकतो, हे कोणत लॉजिक आहे हे तुमच्याही लक्षात आल नसेल. पण साउथच्या सिनेमात चालत असं..
आता आणखी एक सगळ्यात मोठी चुक म्हणजे लाल चंदनाची ज्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये पुष्पा या लाल चंदनाच्या लाकडांना नदीमध्ये फेकतो,आणि हाच या चित्रपटाचा महत्वाचा भाग आहे. या लाल चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. भारतामधील चंदनाला सर्वात जास्त मागणी चीनमध्ये आहे. या लाकडाच वैशिष्ट्य म्हणजे याचा छोटासा तुकडा जरी पाण्यात टाकला तरी तो बुडतो आणि यावरुनच याची गुणवत्ता तपासली जाते. मात्र या चित्रपटात ही लाकडे चक्क पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. बाकी सगळ ठिक आहे , पण इतकी मोठी चूक अशा सुपरहिट चित्रपटाच्या निर्मात्याकडून व्हावी म्हणजे अवघड आहे.
आता आणखी एका सीनमध्ये अल्लू अर्जुन ट्रकच्या बोनेटवर बसून ट्रक फिरवताना दिसतोय आणि ट्रकसुद्धा जोरात फिरतोय, मात्र ट्रकला ड्रायव्हर नसताना फिरतोय कसा हे लॉजिक काही आपल्याला समजलं नाही आहेत की नाही चूका तरीही चित्रपट मात्र सुपरहिट ठरलाय.
हेही वाचा :