Thursday, July 18, 2024

वाढतच चाललाय शेजाऱ्यासोबत सलमान खानचा वाद, अभिनेत्यावर लावले गेले ‘हे’ धक्कादायक आरोप!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा शेजारी केतन कक्कर यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. पनवेलमध्ये अभिनेत्याच्या फार्महाऊसजवळ जमीन असलेल्या त्याच्या शेजारी केतन कक्करवर सलमान खानने मानहानीचा दावा केला होता. सलमान खानच्या म्हणण्यानुसार, केतन एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याविरोधात बोलला होता. त्याचवेळी, आता या प्रकरणाच्या ताज्या सुनावणीत, सलमानने त्याच्या वकिलामार्फत शेजारी केतनवर आपली धार्मिक ओळख विनाकारण वादात ओढल्याचा आरोप केला आहे.

एका वृत्तानुसार, गुरुवारी (२० जानेवारी) झालेल्या सुनावणीदरम्यान सलमान खानचे वकील प्रदीप गांधी यांनी केतन कक्करची पोस्ट आणि मुलाखत न्यायालयासमोर वाचली. ते म्हणाले की, केतनने सलमान खानवर ‘डी गँग’चा आघाडीचा माणूस असल्याचा, धार्मिक अस्मितेवर भाष्य करणारा आणि केंद्र आणि राज्य पातळीवरील सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही, असाही दावा करण्यात आला आहे की, लहान मुलांच्या तस्करीत सलमानचा हात असून, चित्रपट कलाकारांचे मृतदेह त्याच्या फार्म हाऊसवर पुरण्यात आले आहेत. (salman khan has responded to the allegations of his farmhouse neighbour)

केतन कक्करच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना सलमान खानने त्याच्या वकिलामार्फत सांगितले की, “केतन कक्करचे हे सर्व आरोप कोणत्याही पुराव्याशिवाय त्याच्या विचारांची उपज आहेत. मालमत्तेच्या वादात तुम्ही माझी वैयक्तिक प्रतिष्ठा का खराब करत आहात? धर्माला मध्ये का आणताय? माझी आई हिंदू आहे, माझे वडील मुस्लिम आहेत आणि माझ्या भावांनी हिंदूंमध्ये लग्न केले आहे. आम्ही सगळे सण साजरे करतो.”

सलमान खान पुढे म्हणाला, “तुम्ही एक शिक्षित व्यक्ती आहात, असे आरोप करणारा गुंडाछाप नाही. काही लोकांना जमवून आपला राग सोशल मीडियावर काढणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे.” राजकारणात जाण्याची इच्छा नसल्याचेही यावेळी सलमान म्हणाला.

सलमान खान प्रकरणानुसार, केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलशी बोलताना सलमान खानसाठी अपशब्द वापरले होते. या प्रकरणात सलमान खानने यूट्यूब व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर आणि गुगलसारख्या सोशल मीडिया साइट्सची नावे आपल्या केसमध्ये समाविष्ट केली असून, हा अपमानास्पद मजकूर वेबसाइट्सवरून हटवावा किंवा ब्लॉक करावा, अशी मागणी त्याने केली आहे.

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

हे देखील वाचा