चाहत्यांना पोट दुखेपर्यंत हसवलं, पण काळाच्या ओघात मागे पडले ‘हे’ विनोदवीर

0
87
Raju-Shrivastav-And-Sunil-Grover
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/ SET India & Instagram/rajusrivastavaofficial

टेलिव्हिजनवरील तुमचा आवडता कॉमेडियन कोण? असा प्रश्न विचारला तर आपसूकच तुमच्या तोंडात भारती सिंग आणि कपिल शर्मा यांचे नाव येईल. त्यांनी त्यांच्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना एवढे खिळवून ठेवले आहे की, त्यांना फक्त पाहिले तरी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येते. आपल्या आयुष्यातील दुःखाला थोडासा विसावा देत हेच कलाकार आपल्याला आनंदाचे काही क्षण देत असतात. सुरुवातीला टेलिव्हिजनवर अनेक विनोदी कलाकार होते. परंतु हळूहळू काळाच्या ओघात या कलाकारांची चर्चा कमी झाली. आणि त्यांचे चाहते देखील त्यांचे नाव विसरू लागले. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते विनोदी कलाकार ज्यांनी एके काळी छोटा पडदा गाजवला आहे, परंतु काळाच्या ओघात त्यांचे नाव मागे पडले.

सुनील ग्रोवर
यादीतील पहिले नाव अनेकांच्या ओळखीचे. ते म्हणजे सुनील ग्रोवर. ‘द कपिल शर्मा’ शोमधून सुनीलला ओळख मिळाली आणि तो घराघरात पोहचला. कपिलचा शो सोडल्यानंतर त्याने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले. नुकतेच काही दिवसांपूर्वी तो सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटात धमाल करताना आपल्याला दिसला आहे. परंतु एवढे करूनही तो काही प्रेक्षकांच्या मनात त्यांचे आधीचे स्थान निर्माण करू शकला नाही. त्याने अनेक धमाकेदार शोमधून पुनरागमन केले; परंतु त्याचा त्याला काहीही उपयोग झाला नाही. त्याच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा ‘कपिल शर्मा शो’मध्ये पाहायचे होते. परंतु त्याला कपिलसोबत काम करण्याची इच्छा नव्हती आणि म्हणूनच हळूहळू त्याचे नाव देखील गायब होऊ लागले.

राजू श्रीवास्तव
यादीतील दुसऱ्या कलाकाराचे नाव आहे राजू श्रीवास्तव. राजू श्रीवास्तव हे नाव इंडियाच्या बिझी स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखले जाते. त्याने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘द कपिल शर्मा शो ‘आणि ‘कॉमेडी सर्कस’ यांसारख्या शोमध्ये त्याचा जलवा दाखवला आहे. परंतु आता त्याचे ना फारसे कोणाच्या लक्षात नाही. त्याने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन कॉमेडी कोर्स सुरू केला होता. ज्यात तो अनेकांना कॉमेडी शिकवत होता. तसेच तो सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असतो. इतके करून देखील त्याच्या चाहत्यांचे तो आधीसारखे मनोरंजन करण्यास अयशस्वी ठरला आहे.

एहसान कुरैशी
पुढील विनोदवीर आहे एहसान कुरैशी. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचा’ रनरअप विजेता एहसान कुरैशी त्याच्या कॉमेडीसाठी लोकप्रिय आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून देखील तो त्याची ओळख गमावत चालला आहे. मागील अनेक दिवसापासून तो कोणत्याही कॉमेडी शोमध्ये दिसला नाही. त्यामुळे त्याचे चाहते देखील त्याचे नाव विसरत चालले आहेत.

राजीव ठाकूर
कॉमेडी कलाकार म्हणजे त्यात राजीव ठाकूर हे नाव येतेच. त्याने अनेक वर्ष कॉमेडी सर्कसमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याने कपिल शर्मा शोमध्ये काम केले आहे. एवढी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवलेला हा कलाकार सध्या कुठेही दिसत नाही. त्यामुळे काळानुसार त्याचे चाहते देखील त्याला विसरत आहेत.

गोपी भाल्ला
कॉमेडी कलाकारांच्या यादीतील पुढील नाव म्हणजे गोपी भाल्ला. २००६ साली सुरू झालेल्या ‘एफआईआर’मध्ये गोपीने हेड कॉन्स्टेबल गोपी हे पात्र निभावले होते. अत्यंत विनोदी पद्धतीने हे पात्र रंगवण्यात आले होते. त्याचे हे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडले होते. शोने त्याला लोकप्रियता देखील मिळवून दिली. परंतु हा शो संपल्यानंतर तो दुसऱ्या कोणत्याही शो मध्ये दिसला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कोट्यवधी रुपयांचे मालक असूनही ‘या’ ५ अभिनेत्यांचे पाय मात्र जमिनीवरच, एक तर कमाईच्या ९० टक्के करतो दान
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
दत्त साहेबांचा विषय खोल! भारतात बनलेल्या ‘त्या’ सिनेमात होतं फक्त एकच पात्र, गिनीज बुकमध्येही नोंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here