Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड तीन-तीन वेळा लग्न करून सुखी संसार थाटणाऱ्या कलाकारांच्या पहिल्या पत्नींबद्दल माहितीये का? श्रीदेवींचाही समावेश

तीन-तीन वेळा लग्न करून सुखी संसार थाटणाऱ्या कलाकारांच्या पहिल्या पत्नींबद्दल माहितीये का? श्रीदेवींचाही समावेश

लग्न! किती छोटा शब्द आहे ना हा, पण शब्द जरी छोटा असला, तरीही त्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. दोन व्यक्तींची मनं जुळून ते एकमेकांच्या जवळ येतात आणि पुढचं आख्खं आयुष्य सोबत जगावं या विचारानं ते लग्नाची गाठ बांधतात. मात्र, काही नाती अशी असतात, ज्यांमध्ये गाठ पडल्याशिवाय राहतच नाही. असंच काहीसं आहे बॉलिवूड कलाकारांबाबतही. अनेक कलाकारांनी एक-दोन नाही, तर ३-३ वेळा लग्न केली. अनेकांना या बॉलिवूड कलाकारांच्या पहिल्या पत्नींबद्दल फारसं माहितीच नाही, पण चिंता नसावी. या लेखातून आम्ही तुम्हाला ७ बॉलिवूड कलाकारांच्या पहिल्या पत्नींबद्दल पाहणार आहोत.

संजय दत्त- रिचा शर्मा
बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये ज्याची गनणा होते, तो म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt). संजयला ‘संजू बाबा’ या नावानंही ओळखलं जातं. संजयच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा. रिचा ही बॉलिवूड अभिनेत्री होती. या दोघांनीही १९८७ साली न्यूयॉर्कमध्ये आपला संसार थाटलेला, पण लग्नानंतर रिचानं सिनेसृष्टीला रामराम ठोकत हाऊसवाईफ बनून आपलं घर सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्रिशाला दत्त या मुलीचं जगात स्वागत केलं. लग्नाच्या दोनच वर्षांनंतर रिचाला ब्रेन ट्यूमर झाला आणि तिने न्यूयॉर्कमध्ये आपल्या आई-वडिलांच्या घरातच १९९६ साली शेवटचा श्वास घेतला. पुढे संजू बाबाही आपल्या आयुष्यात पुढे गेला आणि त्यानं १९९८ साली मॉडेल रिया पिल्लईसोबत लग्नगाठ बांधली, पण पुढं त्यांचं काही पटलं नाही आणि २००८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आता तो मान्यता दत्तसोबत सुखी आयुष्य घालवत आहे.

फरहान अख्तर- अधुना भबानी
हिंदी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक सिनेमे देणारा अभिनेता- दिग्दर्शक म्हणून फरहान अख्तरला ओळखलं जातं. फरहानच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे अधुना भबानी. या जोडप्यानं लग्नाच्या तब्बल १५ वर्षांनी घटस्फोट घेतल्यानंतर चाहत्यांसोबतच बॉलिवूड कलाकारांनाही धक्काच बसला होता. अधुना ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम हेअर स्टायलिस्ट म्हणून ओळखली जाते. तिनं पहिल्यांदाच मुंबईत ‘ज्यूस’ नावाचं सलून सुरू केलं होतं. आता तिची संपूर्ण भारतभर ‘बी ब्लंट’ नावाची सलून चैन आहे. फरहाननं अभिनेत्री अदिती राव हैदरीला डेट करण्यास सुरुवात करणं, हेच त्यांच्या घटस्फोटामागील कारण असल्याचं म्हटलं जातं.

आमिर खान- रीना दत्ता
बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ कोण बरं? असा प्रश्न विचारला तर नाव येतं ते म्हणजे आमिर खानचं. आमिरनं आपल्या बालपणीची मैत्रीण रीना दत्तासोबत संसार थाटला होता. मात्र, लग्नाच्या १६ वर्षांनंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आमिरला पहिली पत्नी रीनाकडून जुनैद आणि इरा खान हे दोन अपत्य आहेत.

सैफ अली खान- अमृता सिंग
एकेकाळी हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता सिंगचाही यामध्ये समावेश आहे. अभिनेता सैफ अली खानची ती पहिली पत्नी होती. २१ वर्षांच्या सैफनं ३३ वर्षांच्या अमृतासोबत संसार थाटलेला. त्यांच्या वयात तब्बल १२ वर्षांचा गॅप होता. जेव्हा सैफनं गर्लफ्रेंड रोजाला डेट करण्यास सुरुवात केली, तेव्हाच अमृतानं दोन लेकरांसह सैफसोबतच्या आपल्या १२ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं नातं तोडत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सैफनं करीना कपूरसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं होतं.

धर्मेंद्र- प्रकाश कौर
धरम पाजींनी वयाच्या १८ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत संसार थाटलेला. प्रकाश या होत्या पाकिस्तानात जन्मलेल्या प्रसिद्ध पंजाबी गायिका. मात्र, ‘हीमॅन’ धरम पाजींनी सिनेसृष्टीत एन्ट्री केली अन् त्यानंतर त्यांच्या मनात ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी बसली, पण त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या त्यांना घटस्फोटच देत नव्हत्या. असं असलं तरी त्यांना हेमांशी लग्न करायचं तर होतंच. म्हणून धरम पाजींनी इस्लाम धर्म स्वीकारत हेमा मालिनींशी लग्न केलं होतं.

राज बब्बर- स्मिता पाटील
आपल्या अभिनयाने तरुणाईला घायाळ करणारी अभिनेत्री स्मिता पाटील ही अभिनेते राज बब्बर यांची पहिली पत्नी होती. स्मिताने हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, आणि बंगाली भाषिक सिनेमात काम केलं होतं. दुर्दैवानं स्मिता यांनी १९८६ साली या जगाला कायमचं अलविदा केलं होतं. स्मिता आणि राज यांना फक्त एकच मुलगा आहे, तो म्हणजे प्रतीक बब्बर. प्रतीकही अनेक हिंदी सिनेमात झळकलाय.

मिथुन चक्रवर्ती- श्रीदेवी
सदाबहार अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खूप कमी चाहत्यांना माहिती असतील. त्यातीलच एक सत्य आहे की असत्य हे माहिती नाही, पण माध्यमांतील वृत्तांनुसार, त्या मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी होत्या. श्रीदेवींनी गुपचूप खासगी पद्धतीने लग्न केलं होतं. मिथुन यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिल्यानं, श्रीदेवींनी मिथुन यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

विसाव्या वर्षी साकारला ८० वर्षांचा म्हातारा, दिलीप साहेबांवरील प्रेमाखातर मनोज यांनी बदलले स्वत:चे नाव

एवढ्या मोठ्या सुपरस्टारने ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचवेळी का घातली १९९ रुपयांची चप्पल?, जाणून घ्या कारण

अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली; एका चापटीने भागलं नाही, म्हणून जग्गू दादाकडून १७ वेळा खाल्ली कानाखाली

हे देखील वाचा