Saturday, June 29, 2024

स्वातंत्र्याची ७५ वर्षे! बॉलिवूड कलाकारांनी थाटात साजरा केला स्वातंत्र्यदिन

आजचा म्हणजेच १५ ऑगस्ट हा दिवस सर्वांसाठीच अभिमानाचा आहे. सोमवारी (दि. १५ ऑगस्ट) देशभरात ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ फडकवला जात आहे. स्वातंत्र्याचा हाच जल्लोष बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान यांच्यापासून ते अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांच्यापर्यंत प्रत्येकजण आपापल्या खास अंदाजात चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

देशभरात ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवले जात आहे. यामध्ये फक्त सामान्य जनताच नाही, तर बॉलिवूड कलाकारही मोठ्या प्रमाणात सामील होताना दिसत आहेत. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shahrukh Khan) याने स्वातंत्र्य दिनानिमित्त पत्नी गौरी, मुलगा आर्यन आणि अबराम यांच्यासोबत ‘मन्नत’च्या छतावर तिरंगा फडकवला आहे. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

दुसरीकडे ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खान (Salman Khan) यानेही या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्याने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तिरंगा लावून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात सामील झाला. स्वातंत्र्यदिनानिमित्त त्याने तिरंगा फडकावतानाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) यानेही स्वातंत्र्यदिनानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केला. तसेच, त्याने संपूर्ण क्रू मेंबरसोबत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या व्हिडिओवर चाहतेही शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यानेही त्याचे देशप्रेम दाखवून दिले आहे. अभिषेकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिरंगा फडकवतानाचा फोटो शेअर करत चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्याने लिहिले आहे की, “सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

बॉलिवूड अभिनेत्रीही शुभेच्छा देण्यात मागे राहिल्या नाहीत. अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देशातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने भारतीय सैन्यांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा केला. विशेष म्हणजे, त्याने यादरम्यानचा फोटोही सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिनेही तिच्या चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उर्वशीने तिरंगा फडकावत आणि सलाम ठोकतानाचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टला भलेमोठे कॅप्शनही दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिनेदेखील हातात तिरंगा घेत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ईशाने शेअर केलेल्या व्हिडिओत तिने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तिने हा व्हिडिओ शेअर करत “मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रेहना चाहिए,” असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

बॉलिवूड कलाकारांनी दाखवलेल्या देशप्रेमासाठी त्यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच, चाहतेही त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात जन्मूनही भारताचे नागरिकत्व घेणारा अदनान सामी, चार लग्नांमुळे आलेला चर्चेत
प्रजासत्ताक दिन: ‘या’ चित्रपटांमधील संवाद ऐकताच तुमच्या मनात जागृत होईल देशभक्तीची भावना; पाहा यादी
‘बॉर्डर’ चित्रपटानंतर २४ तास जे. पी. दत्तांसोबत असायचे बॉडीगार्ड; येत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या

हे देखील वाचा