बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) अभिनित ‘८३’ मधील ‘लेहरा दो’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. निर्मात्यांनी एका व्हिडिओसह देशभक्तीपर ट्रॅक प्रदर्शित केला आहे, जो तुम्हाला अरिजित सिंगच्या मधुर आवाजाने प्रेरित करेल. ’८३’ मध्ये रणवीर कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. जो भारताच्या १९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाभोवती फिरतो. हे गाणे स्वतःच एक भावनिक राईड आहे. जे तुम्हाला टीम इंडियाच्या भावना आणि ‘८३’ क्रिकेट विश्वचषकाच्या प्रवासात घेऊन जाईल.
रणवीर ‘८३’ मध्ये कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एमी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी हे देखील दिसणार आहेत. दीपिका पदुकोण या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नी रोमीची भूमिका साकारत आहे.
चित्रपटाच्या नावावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, चित्रपटाची कहाणी १९८३ च्या विश्वचषकाभोवती फिरते. कपिल देव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला प्रथमच विश्वविजेता बनवले. या विजेतेपदानंतर भारतीय क्रिकेटचा इतिहास कायमचा बदलला. कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनचा ’८३’ रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फॅंटम फिल्म्स प्रस्तुत करणार आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि पीव्हीआर पिक्चर्सचा हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये ३डी मध्ये प्रदर्शित होणार आहे.
कमल हासनचा राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल, अक्किनेनी नागार्जुनचा अन्नपूर्णा स्टुडिओ, पृथ्वीराज प्रॉडक्शन यांनी रिलायन्स एंटरटेनमेंटसोबत तामिळ, तेलगू आणि मल्याळममध्ये चित्रपट सादर करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. पृथ्वीराज प्रॉडक्शन आणि किच्छा सुदीपाच्या शालिनी आर्ट्स मल्याळम आणि कन्नडमध्ये हा चित्रपट सादर करणार आहेत. दीपिका पदुकोण, कबीर खान, विष्णू वर्धन इंदुरी, साजिद नाडियादवाला, फँटम फिल्म्स, रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.