Thursday, July 31, 2025
Home हॉलीवूड ऐकावे ते नवलच! मालमत्तेच्या वादामुळे चर्चेत असलेल्या ‘या’ नेत्याने केले ५३ वर्षांनी लहान मुलीशी लग्न

ऐकावे ते नवलच! मालमत्तेच्या वादामुळे चर्चेत असलेल्या ‘या’ नेत्याने केले ५३ वर्षांनी लहान मुलीशी लग्न

प्रेम कधी कोणाला होईल हे सांगता येत नाही. त्याचबरोबर प्रेमात वयाच्या अंतरालाही जास्त महत्व नसते असे म्हटले जाते. समाजात अशी अनेक जोडपी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या वयात प्रचंड अंतर आहे. तरी देखील ते लोक सुखाने संसार करतात. अनेकदा तुम्ही हे ऐकलेही असेल की, प्रेमामध्ये वयाच्या अंतराने फारसा फरक पडत नाही. परंतु कधीकधी हे अंतर इतके मोठे होते की, ते लोकांमध्ये चर्चेचा विषय बनते. चला तर मग अशाच एका रंजक प्रेमकथेबद्दल जाणून घेऊया. ज्यामध्ये ८५ वर्षीय व्यक्तीने स्वतःहून ५३ वर्षांनी लहान असलेल्या ३२ वर्षीय मुलीशी लग्न केले आहे आणि दोघेही आपल्या प्रेमाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत.

इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांनी स्वतःहून ५३ वर्षांनी लहान असलेल्या मार्टा फॅसिना हिच्याशी विवाह केला आहे. कारण मालमत्तेच्या वादामुळे या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. ही महिला स्वतः खासदार आहे. मिलानमधील लेस्मो शहरातील महत्त्वाच्या ठिकाण असलेल्या व्हिला जर्नेटो येथे दोघांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी अद्याप अधिकृतपणे लग्न केलेले नाही. कारण या दोघांच्या कुटुंबात जमिनीच्या वारसावरून वाद सुरू आहे.

त्यांची पाच मुलं बर्लुस्कोनीच्या लग्नावर नाखूष दिसत आहेत. कारण आता फॅसिनाचाही त्याच्या ४१७ अब्ज रुपयांच्या मालमत्तेवर हक्क असेल. माध्यमांतील वृत्तानुसार, फसीना याआधी फ्रान्सिस्का पास्कलसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि २०२० मध्ये त्याने तिच्यासोबत ब्रेकअप केला होता. त्यानंतर आता तो बर्लुस्कोनीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. फसीनाने कॅलेब्रियन भाषेत पदवी घेतली आहे. आता सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.

बर्लुस्कोनी यांच्यावर २०१३ मध्येही कर फसवणुकीचा आरोप होता. त्यानंतर सरकारी कार्यालयात त्यांच्या नियुक्तीवर बंदी घालण्यात आली. त्यांच्यावर अनेक गैरव्यवहार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातही आरोपी आहे. बर्लुस्कोनी यांच्या प्रकृतीबाबत विविध प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत असतात. प्रकृतीचे कारण देत त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीतून आपले नाव मागे घेतले. त्यानंतर सर्जियो मॅटारेला यांना इटलीचे नवे प्रमुख बनवण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा