Friday, March 29, 2024

भारतीय सिनेमातील पहिल्या अभिनेत्री बनलेल्या देविका राणी यांनी दिला होता मूवी माफियांविरोधात लढा

भारतीय सिनेमामधील पहिल्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री देविका राणी यांची आज ११४ वी जयंती. देविका राणी यांनी त्याकाळी चित्रपटांमध्ये पदार्पण करत काम करण्यास सुरुवात केली जेव्हा आपल्या देशात या क्षेत्रात काम करणे म्हणजे वेश्यावृत्तीपेक्षा हीन दर्जाचे मानले जायचे. चित्रपटक्षेत्रात आल्यानंतर देविका राणी यांनी समाज आणि रूढीवादी विचार असणाऱ्या लोकांविरोधात मोठी लढाई लढली. ही लढाई लढताना त्यांनी त्यांच्यातली प्रतिभा सिद्ध केली आणि भारतीय सिनेसृष्टीतील पहिली महिला अभिनेत्री बनल्या. या क्षेत्रात येणे आणि टिकून राहणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते.

मद्रास (चेन्नई) प्रेसिडेन्सीचे पहिले सर्जन असलेल्या घरात देविका राणी यांचा जन्म झाला. देविका यांची आजी सुकुमारी देवी या ठाकूर रवींद्रनाथ टागोर यांच्या बहीण होत्या. सुशिक्षित परिवारात जन्म घेतलेल्या देविका यांना वयाच्या नवव्या वर्षीच इंग्लंडच्या बोर्डिंग स्कुलमध्ये पाठवले गेले. इंग्लंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि तिथेच मोठ्या झालेल्या देविका यांची भेट चित्रपट निर्माते हिमांशू यांच्याशी इंग्लंडमध्ये झाली. लंडनमध्ये आपल्या ‘द थ्रो ऑफ डाइस’ सिनेमाची शूटिंग करत असलेल्या हिमांशू यांना देविका यांचे नाव आवडले आणि त्यांनी त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्यास सांगितले. टेक्स्टाइल डिझायनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या देविका यांना ही ऑफर आवडली आणि त्यांनी हिमांशू राय यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कॉस्ट्यूम डिजाइनर आणि आर्ट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

एकत्र काम करत असताना हिमांशू राय आणि देविका राणी एकमेकांच्या प्रेमात पडले. भेटीच्या एक वर्षानंतर त्यांनी लग्न केले. १९३३ साली हिमांशू यांनी काही लोकांच्या मदतीने त्यांचा पहिला ‘कर्मा’ सिनेमा प्रदर्शित केला. या सिनेमात देविका राणी आणि हिमांशू राय मुख्य भूमिकेत होते. याच सिनेमात या दोघांनी चार मिनिटांचा लांबलचक पहिला किसिंग सीन दिला होता. ‘कर्मा’ प्रदर्शित झाल्यानंतर भारतात मोठा वाद उभा राहिला, मात्र देविका या घाबरल्या नाही त्या धीराने उभ्या राहिल्या.

लग्नाच्या सहा वर्षांनी १९३४ साली हिमांशू देविका यांना घेऊन भारतात परत आले. इथे आल्यानंतर त्यांनी काही लोकांच्या मदतीने त्यांचे त्यांचे ‘बॉम्बे टॉकीज़’ नावाचे प्रोडक्शन हाऊस चालू केले. या स्टुडिओने पुढील ५/६ वर्षांमध्ये अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. यातील काही चित्रपटांमध्ये देविका राणी मुख्य भूमिकेत होत्या. भारतात आल्यानंतर १९४० साली देविका यांचे पती असलेल्या निर्माता हिमांशू यांचे निधन झाले आणि देविका यांनी प्रोडक्शन हाऊसला सांभाळत शशधर मुखर्जी आणि अशोक कुमार यांच्या मदतीने अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली.

मात्र काही मूवी माफिया लोकांना हे अजिबातच मंजूर नव्हते की कोणत्या अभिनेत्रीने या क्षेत्रात काम करत यश मिळवावे आणि राज्य करावे. याचमुळे देविका यांच्या देखरेखीत सिनेमे फ्लॉप होण्यास सुरुवात झाली तर त्यांच्या साथीदारांच्या देखरेखीतील सिनेमे हिट झाली. मूवी माफिया यांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर आणि त्यांचे खरे रूप पाहिल्यानंतर १९४५ साली देविका राणी यांनी चित्रपटांमधून संन्यास घेतला आणि रशियन पेंटर असलेल्या स्वेतोस्लाव रोरिच यांच्याशी लग्न केले. हिंदी सिनेमातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९५८ साली पद्मश्री पुरस्कार दिला गेला. १९६९ साली दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारीय ठरल्या. काही वर्षांनी देविका यांच्या पतीचे स्वेतोस्लाव रोरिच यांचे निधन झाले त्यानंतर एक वर्षाने ७ मार्च १९९८ साली देविका यांचे देखील निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा