Monday, July 1, 2024

अरे व्वा! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सोहळ्याला नाशिकमध्ये दिमाखात सुरुवात

मागील अनेक महिन्यांपासून साहित्यरसिक ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट बघत होते, त्या साहित्याच्या मेळाव्याची अखेर आज सुरुवात झाली. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नाशिक मध्ये होणारे संमेलन स्थगित करण्यात आले होते. कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये आज (३ डिसेंबर) रोजी ९४ व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले असून, पुढील दोन दिवस रसिकांना वेगवेगळ्या साहित्यकारांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ प्रेक्षकांना घेता येणार आहे.

 

नाशिकमध्ये ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज (३ डिसेंबर) सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वस्थतेमुळे संमेलनाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या गर्जा जयजयकार या गीताने उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या उदघाटनप्रसंगी मंत्री सुभाष देसाई, कौटिकराव ठाले पाटील उपस्थितीत होते. सोबतच विश्वास पाटील, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, नागनाथ कोतापल्ले, उत्तम कांबळे, यांच्यांसाह कृषी मंत्री दादा भुसे आदी मान्यवर सुद्धा उपस्थित होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते संमेलनस्थळी भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य क्रांतीज्योती सावित्रीबाई, महात्मा फुले प्रवेशद्वाराजवळ ध्वजारोहण सोहळा देखील संपन्न झाला.

 

Photo Courtesy: twitter/Nashik Tak

तत्पूर्वी सकाळी संमेलनाला सुरूवात होण्यापूर्वी काही कलाकारांनी संत गाडगे महाराजांचा वेश परिधान करून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या बाहेर साफसफाई केली. त्यानंतर कुसुमाग्रजांचे निवासस्थान असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झालेल्या या दिंडीचा शेवट सार्वजनिक वाचनालयाजवळ झाला. या दिंडीत शाळकरी मुलं, ढोल पथकं, लेझीम पथकं, विविध मान्यवर, सामान्य नागरिक, वारकरी सहभागी झाले होते. दिंडीचा मार्ग अतिशय सुंदर आणि मोठ्या रांगोळ्या काढत सुशोभित करण्यात आला होता.

अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर अनुपस्थित राहिल्यामुळे यावेळी बोलताना नाराजी देखील व्यक्त केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

 

हे देखील वाचा