Sunday, June 22, 2025
Home कॅलेंडर गायक झुबिन गर्ग मिरगीच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक!

गायक झुबिन गर्ग मिरगीच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक!

बॉलिवूड आणि आसाममधील प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग (Zubeen Garg) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, आसाममधील दिब्रुगढ येथील एका रिसॉर्टमध्ये झुबिन बेहोश झाला होता. यानंतर गायकाला एअरलिफ्टद्वारे गुवाहाटी येथील रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टर म्हणाले की झुबिनला मिरगीचा त्रास होता. गायकाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ या सुपरहिट गाण्याने झुबिन गर्ग रातोरात प्रसिद्ध झाला. 

वृत्तानुसार, झुबिन गर्ग याने मंगळवारी (१९ जुलै) रात्री अस्वस्थतेची तक्रार केली होती. त्यानंतर तो बाथरूममध्ये पडला आणि बेशुद्ध झाला. गायकाला बेशुद्ध अवस्थेत पाहून त्याची टीम चांगलीच घाबरली. यानंतर गायकाला एअर ऍम्ब्युलन्समधून गुवाहाटी येथे नेण्यात आले. (singer zubeen garg hospitalised)

गायकाला गुवाहाटी येथील खासगी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गर्गच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला काही टाकेही पडले आहेत. त्याच वेळी, त्याचे एमआरआय स्कॅन देखील झाले आहे. रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर राणा बरुआ यांनी सांगितले की, ५२ वर्षीय गर्ग याला अपस्माराचा झटका आला आहे.

गायकाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, इमरान हाश्मी आणि कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ या गाण्याने झुबिन गर्गला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्याने ‘क्रिश ३’ चित्रपटातील ‘दिल तू ही बता’सह अनेक हिट गाणी दिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा