पुन्हा झाला राखी सावंतचा ब्रेकअप! रडत रडत पॅपराझींना सांगितलं गऱ्हाणं

0
415
Rakhi Sawant
Rakhi Sawant

अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत (Rakhi Sawant) अनेकदा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजकाल ती पुन्हा एकदा तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. खरं तर, काही दिवसांपासून ती दुबईच्या आदिल खान नावाच्या बिझनेसमॅनला डेट करत आहे. मात्र, आता अभिनेत्रीचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या अंदाज लावला जात आहे.

एअरपोर्टवर स्पॉट झाली अभिनेत्री
खरं तर, राखीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं, जिथे ती खूप उदास दिसत होती. जेव्हा पॅपराझीने तिला याबद्दल विचारले, तेव्हा तिने तिचा बॉयफ्रेंड आदिलबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली आणि तिने सांगितले की, ती आदिलशी पुन्हा कधीही बोलणार नाही. (rakhi sawant and adil khan breakup)

आदिलला भेटायला गेली होती राखी
राखी सावंत आदिलला भेटण्यासाठी दिल्लीला गेली होती. पण अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, बॉयफ्रेंडने तिला वाट पाहायला सांगितले. मात्र, दोन तास वाट बघूनही तो तिला भेटायला आला नाही, त्यानंतर अभिनेत्री मुंबईला परतली. फ्लाइटमध्ये दोन तास रडत राहिल्याचेही राखी सांगत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

खालील लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडिओ:

https://www.instagram.com/p/CgOVPjwKuKV/?utm_source=ig_embed&ig_rid=fa3c7eeb-d75b-45af-b65f-b90bb6a801a8

काय म्हणाली राखी?
जेव्हा राखीला स्पॉट केले गेले, त्याच दरम्यान एका पॅपराझीने तिला आदिलला एकदा कॉल करण्यास सांगितले. मात्र, अभिनेत्रीने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, “मी आता बोलणार नाही, आता त्याला फोन करणार नाही. ऍटिट्यूड आहे, मलाही स्वाभिमान आहे. तो आला नाही, मला वाट पाहायला लावली.”

मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच अशा चर्चा सुरू झाल्या की, आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, यानंतर आता राखीची काय प्रतिक्रिया समोर येते, हे पाहावे लागेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here