Wednesday, January 28, 2026
Home साऊथ सिनेमा घटस्फोटानंतर १० महिन्यांनी नागा चैतन्यने केले मन मोकळे, सांगितली ‘ती’ भयाण गोष्ट

घटस्फोटानंतर १० महिन्यांनी नागा चैतन्यने केले मन मोकळे, सांगितली ‘ती’ भयाण गोष्ट

समंथा रुथ प्रभूने (samntha ruth prabhu)अलीकडेच ‘कॉफी विथ करण’ (coffee with karan)या शोमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. दरम्यान, तिचा पूर्व पती साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य (naga chaitanya) देखील खूप चर्चेत आहे. घटस्फोटाच्या १० महिन्यांनंतर दोघेही एकमेकांबद्दल उघडपणे बोलत आहेत.

नागा चैतन्य म्हणाला की, “समंथापासून घटस्फोट हा खूप वेदनादायक आणि कठीण काळ होता पण आता सर्व काही ठीक आणि चांगले आहे.” नागा चैतन्य सांगतो की, समंथापासून विभक्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप बदल झाला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की पूर्वी तो उघडपणे बोलू शकत नव्हता पण आता तो हे करू शकतो.

चैतन्यने असेही सांगितले की, आता तो त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या खूप जवळचा वाटतो. स्वतःला एका नवीन व्यक्तीमध्ये बदललेले पाहून त्याला खूप आनंद होतो. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे समंथाने तिच्या सोशल अकाउंटवरून नागा चैतन्यसोबतचे फोटो काढून टाकले असले तरी, अभिनेत्रीच्या पूर्व पतीच्या इन्स्टाग्रामवर अजूनही दोघांचे रोमँटिक फोटो आहेत. त्यांच्यातील असलेले प्रेम सगळ्यांना खूप आवडत होते. त्यांच्या प्रेमाचा अनेकजण आदर्श घेत होते. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या त्यांच्या चाहत्यांना देखील खूप दुःख झाले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नागा चैतन्य आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचे अधिकृत हिंदी रूपांतर आहे. यामध्ये करीना कपूर खान मोना सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ ११ ऑगस्ट २०२२ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

नागा चैतन्यचा ‘थँक यू’ २२ जुलै २०२२ रोजी रिलीज झाला आहे, ज्यामध्ये तो अविका गौर आणि राशी खन्नासोबत दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमात नवा ट्विस्ट, ‘या’ दिग्गज स्पर्धकाला रोहित शेट्टीने दाखवला बाहेरचा रस्ता

गोविंदा का म्हणाला, ‘करण जोहर सर्वात ईर्ष्यावान व्यक्ती आहे’, कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

‘या’ राजवाड्यात झालं ‘भूलभुलैया’चं शूट; कोणी ऐकला विचित्र आवाज, कोणी म्हटलं, ‘शिरच्छेद केलेला माणूस दिसला’

हे देखील वाचा