Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे’, ट्रोलिंंगनंतर गायक राहुल देशपांडेंनी टिकाकारांना दिले चोख उत्तर

सध्या देशभरात आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही हा विरोध कायम असून नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी या चित्रपटाच्या प्रिमियरला हजेरी लावल्याने त्यांच्यावर जोरदार टिका होताना दिसत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, गायक राहुल देशपांडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ते नेहमीच विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. राहुल देशपांडे यांनी नुकतीच बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपटाच्या प्रिमियरला हजेरी लावली होती. ज्याची पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केली होती.

मात्र त्यांच्या या पोस्टमुळे त्यांना नेटकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत असून त्यांना जोरदार ट्रोल केले जात आहे.  प्रिमियरला हजेरी लावल्यानंतर राहुल देशपांडे यांनी चित्रपटाचे कौतुक केले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत जोरदार ट्रोल केले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः एक पोस्ट करत त्यांच्या या भूमिकेबद्दलचे स्पष्टिकरण दिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

या पोस्टमध्ये ते म्हणतात की, ” लालसिंग चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय.त्या प्रिमीयरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे वा त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही. आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करून घेऊ नये, अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती.लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा.”

दरम्यान, राहुल देशपांडे यांच्याप्रमाणे अभिनेत्री रिंकू राजगुरूलाही लालसिंग चड्ढा चित्रपटाच्या प्रिमियरला हजेरी लावल्याने तिलाही नेटकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा –

अजय आणि युग या बाप-लेकामधील झक्कास नातं व्हिडिओतून आलं समोर, चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव

रिलीझपूर्वीच विजय-अनन्याच्या सिनेमाने केली छप्परफाड कमाई; जगभरात ‘एवढ्या’ कोटीत विकले गेले थिएटर राईट्स

मोठी बातमी! प्रसिद्ध कन्नड गायकाचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव

 

हे देखील वाचा