Friday, March 29, 2024

मोठी बातमी! प्रसिद्ध कन्नड गायकाचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड गायक शिवमोगा सुब्बन्ना यांचे गुरुवारी (दि. ११ ऑगस्ट) रात्री उशिरा निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामागे हृदयविकाराच्या झटका असल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुब्बन्ना हे बंगळुरू शहरातील जयदेव रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या कुटुंबात त्यांच्याव्यतिरिक्त पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांची मुलगी एस. भाग्यश्री ही ‘द हिंदू’ कर्नाटकची संपादक आहे.

मागे सोडली गाण्यांची अमाप संपत्ती
शिवमोगा सुब्बन्ना (Shivamogga Subbanna) हे कन्नड सुगम संगीताच्या दुनियेचे बादशाह होते. संगीतात येण्यापूर्वी ते वकील म्हणून काम करत होते. दिग्गज कवींच्या कविता त्यांनी गीतमालेत ओवत लोकांपर्यंत पोहोचवल्या. वयाच्या ८३ वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या सुब्बन्ना हे त्यांच्या मागे गाण्यांची अमाप संपत्ती सोडून गेले. त्यांच्या निधनाने चाहते दु:खात आहेत.

कशी मिळाली प्रसिद्धी
सुब्बना यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या कवितांना संगीत दिले आणि आपल्या अंदाजात लोकांपर्यंत पोहोचवले. सुब्बन्ना हे सुरुवातीला कन्नड भाषेतील पार्श्वगायक होते, ज्यांना १९७८ साली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांना ‘काडू कुडुरे ओडी बानडिट्टा’ या गाण्यासाठी मिळाला होता.

संगीताची निर्मिती
पेशाने वकील असूनही त्यांना संगीताचे चांगले ज्ञान होते. प्रसिद्ध कन्नड कवी केवी पुट्टुप्पा, दा रा बेंद्रे आणि इतर कवींच्या कवितांसाठी सुब्बन्ना यांनी संगीत तयार केले. त्यांच्या कवितांना रागमयी पद्धतीने सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. राष्ट्रीय पुरस्कारांव्यतिरिक्त त्यांना २००६मध्ये कन्नड कंपू पुरस्कारही देण्यात आला. विशेष म्हणजे, कुवेंपू विश्वविद्यालयातून त्यांना डॉक्टरेट पदवीही मिळाली आहे.

सुब्बन्ना यांच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ते आजही सुब्बन्ना यांचा आवाज त्यांच्या मोबाईलमध्ये ऐकत असतील. जेव्हाही त्यांना सुब्बन्ना यांची आठवण येईल, ते त्यांचे गाणे ऐकतील. हीच त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती आहे, जी ते सामान्य लोकांमध्ये सोडून गेले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
आणखी एका निर्णयाने अल्लू अर्जुनने जिंकली करोडो चाहत्यांची मने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
उर्वशी रौतेलाचा मोठा खुलासा, ‘या’ व्यक्तीने १२ तास पाहिली होती अभिनेत्रीची वाट
भूमी पेडणेकरने हुमा कुरेशीला का म्हटले कॉपी कॅट? बॉलिवूड मध्ये नव्या वादाला सुरुवात

हे देखील वाचा