‘खतरो का खिलाडी’ अक्षय कुमार याने शुक्रवारी (दि. 09 सप्टेंबर) त्याचा 55वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवशी त्याला चाहत्यांसह सेलिब्रिटीही शुभेच्छा देत आहेत. अशातच अक्षयचा जवळचा मित्र आणि चित्रपटसृष्टीतील त्याचा सहकारी सुनील शेट्टी याने त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या वेळी काढलेल्या फोटोंची झलक पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये दिसणारे काही फोटो त्याच्या चित्रपटांशी संबंधित आहेत, तर काही फोटोशूटमधील आहेत. फोटोंमधून दोन्ही स्टार्सची जिवलग मैत्री दिसत आहे.
सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारची जीवलग मैत्री
व्हिडिओ शेअर करताना सुनील शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले, “हे राजू!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे बाबा!! तुझा वाढदिवस मस्त जावो.” प्रेक्षकांनी ‘हेरा फेरी’मध्ये सुनील शेट्टीला जसे पाहिले होते, तसेच कॅप्शन त्याने त्याच्या व्हिडिओला दिले आहे. या चित्रपटातील सुनील, अक्षय कुमार आणि परेश रावल या त्रिकुटाला चांगलीच पसंती मिळाली होती. अभिनेत्याच्या या ट्विटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Hey Rajuuuuu!! Happy Birthday re baba!! @akshaykumar Have a great one ❤️ pic.twitter.com/pKkQy2gRdR
— Suniel Shetty (@SunielVShetty) September 9, 2022
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी अक्षय कुमारला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुनील शेट्टीपूर्वी सारा अली खान, अजय देवगण, रकुल प्रीत सिंग, वाणी कपूर आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जेव्हापासून अक्षयने त्याच्या अभिनय कारकिर्दीत पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून तो चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
अक्षय कुमारला चित्रपटसृष्टीत 30 वर्षांहून अधिक काळ
अक्षयने 30 वर्षांहून अधिक काळात सुमारे 100 चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक पुरस्कार जिंकले आहेत. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. अक्षयने त्याच्या चाहत्यांचे आभार मानत एक खास नोटही लिहिली आहे. यासोबतच त्याने साऊथ सुपरस्टार सूर्याच्या ‘सूरारई पोतरु’ या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या हिंदी रिमेकमधील फोटोही शेअर केला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
शुबमन गिलच्या मित्राने फोडलं भांडं! वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना घेतलं ‘सारा’चं नाव; पण चाहते गोंधळात
विमानतळावर अचानक धावायला लागली अभिनेत्री काजोल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘द कपिल शर्मा शो’चा प्रोमो शूट केल्यानंतर चंदन प्रभाकरने साेडला शो, कृष्णा अभिषेक देखील दिला डच्चू