अभिनेता सिद्धार्थ निगम लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत दिसणार आहे. अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनेक छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दिसल्या होत्या. सिद्धार्थसोबत त्याच्या चित्रपटात दिसणारी अभिनेत्री शहनाज गिल हीदेखील या पार्टीत दिसली.
शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शहनाज प्रसिद्ध पंजाबी गायक जस्सी गिल (Jassie Gill) याचा हात धरताना दिसत आहे. हा व्हिडिओ सिद्धार्थच्या बर्थडे पार्टीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये शहनाज निळ्या रंगाच्या डेनिममध्ये दिसत आहे. या आऊटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. जस्सी आणि शहनाज एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर लोक तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. मात्र, एका चाहत्याने लिहिले की, “कुणीतरी सिद्धार्थला परत आणा. मला सिडनाझला एकत्र पाहायचंय.”
View this post on Instagram
शहनाज करणार लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खानने तिला ही संधी दिली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शहनाज ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती राघव जुयालसोबत दिसणार आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे.
चित्रपटाच्या नावाची घोषणा
अलीकडेच, चित्रपटाचा मुख्य अभिनेता सलमानने या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. यादरम्यान त्याचा लूक इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या छोट्या व्हिडिओमध्ये अभिनेता मोठ्या केसांमध्ये दिसत होता. त्याचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मिस वर्ल्ड’ बनण्यापूर्वी ‘या’ जाहिरातीने रातोरात प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या, व्हिडिओ वेधतोय लक्ष
‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्यां’चा मोठा निर्णय! आता कुठल्याच सिनेमात देणार नाहीत शिव्या
तोबा तोबा! ऋतिक रोशनची अभिनेत्री समुद्रकिनारी झाली जास्तच बोल्ड; बिकिनीतील व्हिडिओ व्हायरल