‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्यां’चा मोठा निर्णय! आता कुठल्याच सिनेमात देणार नाहीत शिव्या

0
80
Pankaj-Tripathi
Photo Courtesy : Instagram/pankajtripathi

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आतापर्यंत चित्रपटात निरनिराळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. पंकज यांनी अनेक चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे, ज्यात त्यांच्या डायलॉग्जमध्ये खूप शिव्या आणि अश्लील भाषेचा वापर केला गेला आहे. मात्र, आता ‘कालीन भैय्या’ सिनेमात कधीच शिव्या देणार नाही. 

नुकत्याच एका मुलाखतीत पंकज त्रिपाठीला (Pankaj Tripathi) विचारण्यात आले की, आता तुम्ही चित्रपटात शिव्या आणि अश्लील भाषेचा वापर करणार का? यावर उत्तर देत पंकज म्हणाले, “हाे, मी ठरवलं आहे की, माझ्या ज्या भूमिका असतील, त्यात मी अश्लील भाषेचा वापर करणार नाही. खूपच गरज पडल्यास मी त्याला क्रिएटिव्ह करून दाखवेल.” पंकज त्रिपाठी यांचे ज्या भूमिकेसाठी काैतुक झाले, ते म्हणजे 2012साली रिलीज झालेला ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मधला ‘सुल्तान खान’ आणि वेबसीरीज ‘मिर्झापूर’मधील ‘कालीन भैय्या’ होय. या दाेन्ही भूमिकेतील डायलॉग्जमध्ये खूप शिव्या आणि अश्लील भाषेचा वापर केला गेला हाेता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

यापूर्वीही पंकज त्रिपाठी एका मुलाखतीत पडद्यावर शिव्या आणि अश्लील भाषेसंदर्भात बाेलले हाेते. ते म्हणाले, “ज्यावेळी कुठला अभिनेता पडद्यावर शिव्या देताे, त्यावेळी ताे एक खास अंदाज दाखवत असताे. विनाकारण शिवीगाळ करणे मला देखील आवडत नाही आणि मी त्याचे समर्थनही करत नाही. इतकंच नाहीतर, मी माझ्या सीन्समध्ये अश्लील भाषेचा प्रयाेग करणे टाळताे जाेपर्यंत स्क्रिप्टची अशी कुठली डिमांड नसते. हे स्वत:ला नैतिकतावादी दाखवण्याचं प्रकरण नाही. मी जे काही आहे, ते एका कलाकाराच्या रुपात बघताे आणि त्याची जबाबदारी घेताे.”

पंकज त्रिपाठींनी 2004 साली छाेट्या- मोठ्या भूमिकेतून पदार्पण केले होते. त्यांनी ‘रन’ आणि ‘ओमकारा’मध्ये छाेट्या भूमिका साकारल्या हाेत्या. त्यानंतर ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘फुकरे’, ‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’, ‘ल्युडो’, ‘स्त्री’ आणि ‘मिमी’ सारख्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. याव्यतिरिक्त पंकज त्रिपाठींचा मुख्य भूमिका असलेला ‘मिर्झापूर’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला हाेता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तोबा तोबा! ऋतिक रोशनची अभिनेत्री समुद्रकिनारी झाली जास्तच बोल्ड; बिकिनीतील व्हिडिओ व्हायरल
आता कसं करू! प्रसिद्ध अभिनेत्रीने चुकून शेअर केला पतीसोबतचा ‘तसला’ व्हिडिओ; डिलीट होण्याआधी पाहून घ्या
बाबो! गर्लफ्रेंड वयात आल्यावर ब्रेकअप करतो अभिनेता? आता प्रसिद्ध मॉडेलसोबत जोडलं गेलंय नाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here