‘मिस वर्ल्ड’ बनण्यापूर्वी ‘या’ जाहिरातीने रातोरात प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या, व्हिडिओ वेधतोय लक्ष

0
187
Aishwarya-Rai-Bachchan
Photo Courtesy : Instagram/aishwaryaraibachchan_arb

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने 1994मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. सौंदर्य स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी, ऐश्वर्या 1993 मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये दिसली हाेती, ज्यामध्ये आमिर खान आणि महिमा चौधरी देखील होते. जाहिरातीत ऐश्वर्याचे नाव संजना होते. ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर इतकी प्रसिद्ध झाली की, अनेकांनी आपल्या मुलींचे नाव संजना ठेवले होते.

व्हिडिओमध्ये आमिर खान (Aamir Khan) त्याच्या घरी एकटाच बुद्धिबळ खेळताना दिसतो, जेव्हा तो त्याच्या दाराची बेल ऐकतो आणि दरवाजा उघडताे, तर महिमा चौधरी (Mahima Chaudhry) त्याला पेप्सीची बाटली आणण्यास सांगते. आमिर तिला इम्प्रेस करण्यासाठी पावसात बाहेर पडतो आणि पेप्सीची बाटली आणण्यास यशस्वी ठरताे.

ते घरी परतल्यावर पुन्हा दारावरची बेल वाजते आणि महिमा म्हणते, “ही संजू असावी.” यानंतर ऐश्वर्या (Aishwarya Rai) आत येते आणि ती म्हणते, “हॅलो, मी संजना आहे. तुला दुसरी पेप्सी मिळाली का?” जाहिरातीत, ऐश्वर्याच्या जबरदस्त लूकने तिच्या अनेक चाहत्यांची मने जिंकली. एका वर्षानंतर, जेव्हा तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला, तेव्हा अनेकांना  समजले की, ऐश्वर्या आधीच किती प्रसिद्ध आहे.

चाहत्यांनी केले ऐश्वर्याचे काैतुक
या जाहिरातीवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, “ऐश्वर्याने 3 सेकंदात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.” दुसर्‍या युजरने लिहिले, “या सीनने तिला भारतात रातोरात प्रसिद्ध केले.” संजना नावाच्या मुलीने लिहिले, “ही जाहिरात सांगते की, मला माझे नाव कसे मिळाले.”

‘द पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’मध्ये दिसणार ऐश्वर्या
ऐश्वर्या लवकरच 30 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या ‘द पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्या दुहेरी भूमिकेत आहे. हा चित्रपट याच नावाच्या तमिळ कादंबरीवर आधारित आहे, जी 1950च्या दशकात मालिका म्हणून प्रदर्शित झाली होती. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्यां’चा मोठा निर्णय! आता कुठल्याच सिनेमात देणार नाहीत शिव्या
तोबा तोबा! ऋतिक रोशनची अभिनेत्री समुद्रकिनारी झाली जास्तच बोल्ड; बिकिनीतील व्हिडिओ व्हायरल
आता कसं करू! प्रसिद्ध अभिनेत्रीने चुकून शेअर केला पतीसोबतचा ‘तसला’ व्हिडिओ; डिलीट होण्याआधी पाहून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here