Thursday, April 25, 2024

तोबा तोबा! ऋतिक रोशनची अभिनेत्री समुद्रकिनारी झाली जास्तच बोल्ड; बिकिनीतील व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या रुपेरी पडद्यावर जेवढ्या बोल्ड असतात, तेवढ्याच बोल्ड त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही असतात. या अभिनेत्रींमध्ये अमिषा पटेल हिच्या नावाचाही समावेश होतो. चाळिशी ओलांडल्यानंतरही अमिषा बोल्डनेसने चाहत्यांना भुरळ घालतेय. 46 वर्षीय अमिषा अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. तिला इंस्टाग्रामवर 45 लाख चाहते फॉलो करतात. तिच्या प्रत्येक पोस्टला हजारो लाईक्स मिळतात. अशात तिने पुन्हा एकदा बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे.

बहरीनमध्ये अमिषा पटेल
अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) ही सध्या बहरीनमध्ये आहे. तेथून ती तिच्या चाहत्यांसाठी मनमोहक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. अशात तिने एकापाठोपाठ एक असे दोन व्हिडिओ शेअर केले आहे. या व्हिडिओत अमिषा हिरव्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे. या वयातही अमिषा किती फिट आहे, याचा अंदाज या व्हिडिओवरून लावला जाऊ शकतो. अमिषा तिचा सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या तुफान प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

ऋतिक रोशनसोबत केले होते पदार्पण
अमिषा पटेलला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. मात्र, तिचे नशीब तिला या ग्लॅमरस जगतात घेऊन आले. तिने 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना प्यार है’ या सिनेमातून अभिनयात पाऊल ठेवले होते. विशेष म्हणजे, या सिनेमात तिच्यासोबत ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हा मुख्य भूमिकेत होता. या दोघांनीही याच सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. हा सिनेमा जबरदस्त गाजला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

अमिषाचे सिनेमे
अमिषाच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘कहो ना प्यार है’ या सिनेमानंतर अनेक हिट सिनेमात काम केले. त्यामध्ये ‘गदर’, ‘ये है जलवा’, ‘हमराज’ यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे. मात्र, काळानुसार तिचे सिनेमे अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे अमिषा बॉलिवूडपासून दूर गेली. आता ती कोणत्याच सिनेमात दिसत नाही. मात्र, अमिषाला चाहत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे, हे चांगलेच माहिती आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आता कसं करू! प्रसिद्ध अभिनेत्रीने चुकून शेअर केला पतीसोबतचा ‘तसला’ व्हिडिओ; डिलीट होण्याआधी पाहून घ्या
बाबो! गर्लफ्रेंड वयात आल्यावर ब्रेकअप करतो अभिनेता? आता प्रसिद्ध मॉडेलसोबत जोडलं गेलंय नाव
अर्रर्र! गर्दीत अडकलेल्या रणवीर सिंगला खावी लागली कानाखाली, पण कुणी केलं हे कृत्य?

हे देखील वाचा