Saturday, March 7, 2026
Home कॅलेंडर बादशहाची दर्यादिली! कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पाहा कशी केलीय शाहरुखने मदत

बादशहाची दर्यादिली! कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पाहा कशी केलीय शाहरुखने मदत

कोरोनाच्या बिकट काळात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी स्वतःहून पुढे येत सरकार, प्रशासन आणि लोकांची मदत केली. अक्षय कुमार पासून ते सोनू सूद पर्यंत अनेक कलाकार मदतीसाठी धावले. यात शाहरुखही होताच. शाहरुख खानने आताच काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारला remdesivir इंजेक्शन दिले आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ट्विटरवर शाहरुखचे आभार मानले आहे.

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या किंग खान शाहरुख खान याने कोरोनाच्या कठीण काळात अनेक प्रकारे सरकारला आणि लोकांना मदत केली. आता नुकतेच शाहरुखने दिल्ली सरकारला ५०० remdesivir इंजेक्शन देऊ केले आहे.

दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी एक ट्विट करत शाहरुख खानचे आभार मानले आहे. सत्येंद्र जैन यांनी त्यांच्या ट्विट मध्ये लिहले की, ” आम्ही शाहरुख खान आणि मीर फाउंडेशन यांचे धन्यवाद मानतो, की त्यांनी दिल्लीसाठी ५०० remdesivir इंजेक्शन दिले. ते सुद्धा केव्हा, जेव्हा दिल्लीला या इंजेक्शनची जास्त गरज होती. या कठीण प्रसंगी तुम्ही दिल्लीसोबत उभे राहून दिल्लीला मदत केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ”

सत्येंद्र जैन यांनी केलेल्या या ट्विटला शाहरुखकडून उत्तर आले आहे. तसेच आपल्या कार्याचा गौरव केल्याबद्दल शाहरुखने आभारही मानले आहे. शाहरुखच्या फॅन्सने मात्र शाहरुखला खूप आशीर्वाद दिले आहेत. फॅन्सकडून जैन यांचे ट्विट जोरदार वायरल केले जात आहे. यापूर्वीही शाहरुखने कोरोनाच्या काळात अनेकवेळा मदत केली आहे.

 

शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शाहरुखचा जिरो हा प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा आहे.
शाहरुख येत्या काळात ‘पठाण’ या सिनेमात दिसणार असून ह्या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या शाहरुखचे मुंबईतील स्टुडिओ बाहेरचे अनेक फोटो वायरल झाले होते. शाहरुखच्या लांब केस असलेल्या या फोटोनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

हे देखील वाचा