Sunday, June 8, 2025
Home टेलिव्हिजन तारक मेहतामध्ये दयाबेन परतणार नाही? शैलेश लोढाच्या ‘या’ पोस्टवरून होतेय जोरदार चर्चा

तारक मेहतामध्ये दयाबेन परतणार नाही? शैलेश लोढाच्या ‘या’ पोस्टवरून होतेय जोरदार चर्चा

टेलिव्हिजनवरील तारक मेहता का उल्टा चश्मा ही लोकप्रिय मालिकेने चाहत्यांच्या मनात एकवेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्व कलाकार लोकांच्या घराघरात पोहचले आहे. या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी(Disha Wakani) हिची लोकप्रियता फार आहे. गेल्या काही वर्षांपासून ती मालिकेपासून दूर आहे. आज किंवा उद्या ती मालिकेमध्ये दिसणार असा अंदाज चाहते लावत आहे. अशातच मालिकेतील तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा(Shailesh Lodha) यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रसिद्ध कलाकार आणि कवी शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये सध्या काय परिस्थिती चाललेली आहे हे वेगळ्या अंदाजात त्यांनी सांगितले आहे. लोढांनी दिशा वकानीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्या आता पुन्हा तारक मेहतामध्ये दिसणार नसल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शायरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये ज्याने कुणी ती मालिका सोडली त्याकडे पुन्हा मागे वळून पाहिले नाही असे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

शैलेशच्या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
शैलेश यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या शायरीच्या शेवटच्या ओळी खूप काही सांगून जातात. त्यात अभिनेता आणि कवी शैलेश यांनी लिहिले आहे की, ‘जिसने भी उसे छोड़ा, मुड़ कर नहीं देखा…’ असे लिहिले आहे. शैलेश लोढा यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या मते यातून शैलेश यांनी असित मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. शेवटी, का नाही, त्यांनी तुमचा स्वाभिमान दुखावला आहे. एका नेटकऱ्यांने त्याला विचारले की, त्याने तारक मेहता का उल्टा चश्मा का सोडले. त्याचवेळी, कॉमेंट बॉक्समध्ये वापरकर्त्यांनी त्याला पुन्हा ‘तारक मेहता’ म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि सांगितले की, ते त्याला खूप मिस करत आहेत.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून दिशा वकानी कार्यक्रमात नाहीत. दिशा प्रेग्नंट असल्यामुळे त्यांनी ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतर त्या कार्यक्रमात परतल्याच नाही. पहिल्या बाळाच्या संगोपानात दिशा व्यस्त होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच दिशाला दुसरे बाळ झाले आहे. आजही तिच्या चाहत्यांना आणि निर्मात्यांनी ती कार्यक्रमात परतेल अशी आशा आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच शैलेश यांनी देखील हा कार्यक्रम सोडला. तसेच ज्या ज्या कलाकारांनी कार्यक्रम सोडला ते परत कधीच आले नाहीत. आता ही आशा पूर्ण होते की फेल ठरते हे लवकरच कळेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुख खानची पत्नी होणे गौरी खानसाठी अडचणीचे ठरले, म्हणाली, ‘लोकांनी मला काम…’

‘लाल दु पट्टेवाली’ गाण्याने अमाप प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा, का आहे पडद्याआड?

हे देखील वाचा