Friday, November 14, 2025
Home अन्य बिग ब्रेकिंग! ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्म’हत्या

बिग ब्रेकिंग! ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्म’हत्या

ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने इंदोरमध्ये आपल्या राहत्याघरी गळफास घेऊन आत्माहत्या केल्याची बातमी आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहिले आहे. ज्यामुळे पोलीस तिच्या मृत्यूचा तपास करत आहेत. वैशालीच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

गेल्या 1 वर्षापासून अभिनेत्री वैशाली ठक्कर इंदौरमध्ये राहात आहे. तिच्या मृत्युची बातमी कळताच पोलीसांनी तिच्या घरी धाड घेतली. तिच्या देहाला जप्त केल्यानंतर तिच्यासोबत एक पत्रही मिळाले.  माहितीनुसार  तेजाजी नगरचे पोलीस अधिकारी तिचा मृत्यु कशामुळे झालाय आणि असे कारण होते की, तिने आत्माहत्या करुन जीव दिला याचा शोध घेत आहे.  मृतदेहासोबत मिळालेल्या पत्रातील माहिती लवकरच सगळ्यांसमोर येइल.

अभिनेत्रीच्या बातमीने सगळ्यांना धक्काच बसला आहे. सगळ्यांना तिच्या आत्माहत्येने आश्चर्या वाटत आहे, ती या जगामध्ये राहिली नाही याचा विश्वासच बसत नाही. तिने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये काम केले होते. तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून केली होती. यामध्ये तिने संजनाची भुमिका निभावली होती, जी खूप प्रसिद्ध झाली होती. यानंतर तिने ससुराल सिमरका या मालिकेतही आपली छाप सोडली होती. यामध्ये तिने अंजली भारद्वाज ही भूमिका निभवली होती ज्यामुळे ती खूपच प्रसिद्ध झाली होती.

 

 

 

 

 

 

 

 

ही बातमी अपडेट होत आहे.

 

हे देखील वाचा