Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन वैशाली ठक्करच्या आत्म’हत्येवर नाराज झाले मुकेश खन्ना; म्हणाले, ‘आयुष्यात अडचणी…’

वैशाली ठक्करच्या आत्म’हत्येवर नाराज झाले मुकेश खन्ना; म्हणाले, ‘आयुष्यात अडचणी…’

टीव्हीची टॅलेंटेड आणि सुंदर अभिनेत्री वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 29 वर्षी हे धक्कादायक पावूल उचलून सर्वांनाच गाेंधळात टाकले. वैशालीच्या चाहत्यांपासून तिच्या सहकलाकारांपर्यंत अनेकांनी अभिनेत्रीच्या या वागण्यावर खंत व्यक्त केली आहे. आता टीव्हीवरील शक्तीमान म्हणजेच मुकेश खन्ना यांनीही अभिनेत्रीच्या मृत्यूवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच ते इंडस्ट्रीमध्ये वाढत्या आत्महत्येच्या घटनांबाबतही बाेलले.

यूट्यूबवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत, मुकेश खन्ना (mukesh khanna) यांनी वैशाली ठक्कर (vaishali takkar) हिच्या मृत्यूचे वर्णन निराशाजनक असल्याचे सांगितले आणि मनोरंजन उद्योगातील आत्महत्येच्या वाढत्या समस्येबद्दल बोलले. मुकेश म्हणाले, “आयुष्यात अडचणी येतात, अचानक धक्काही बसतो आणि तुम्ही लोक पंख्याला लटकून बसता. सेटवर सगळ्यात हसमुख मुलगी  हे कसं करू शकते, पण काेणीही हे कश्याप्रकारे थांबवावे यावर बाेलत नाही.” व्हिडिओमध्ये, मुकेश खन्ना यांनी अभिनेत्यांच्या कर्जबाजारी विषयीही सांगितले की, कश्याप्रकारे स्टार्स ईएमआयच्या ओझ्याखाली पडतात आणि नंतर डिप्रेशनमध्ये जातात.

वैशाली ठक्करच्या आत्महत्ये अपडेटबाबत बोलताना मुख्य आरोपी राहुल नवलानी याला पोलिसांनी इंदूर येथून अटक केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, राहुल पळून जाण्यासाठी  सतत आपले लोकेशन बदलत होता. राहुलला परदेशात पळून जाण्यापासून रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने लुकआउट सर्कुलरही जारी केले होते. यासोबतच त्याच्यावर 5 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. राहुलच्या शोधात पोलिसांचे पथक मुंबई आणि जयपूरलाही गेले हाेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

वैशाली ठक्कर प्रसिद्ध शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये संजनाची भूमिका साकारताना दिसली आहे. या शोमधून तिला बरीच ओळखही मिळाली. या शोनंतर ती ‘ये वादा रहा’, ‘ये है आशिकी’, ‘ससुराल सिमर का’, ‘सुपर सिस्टर’, ‘लाल इश्क’ मध्ये दिसली हाेती. वैशाली शेवटची 2019च्या ‘मनमोहिनी’ शोमध्ये देखील दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-

जलवा! बेला हदीदची कॉपी करत उर्फीने केला फुफ्फुसाचा ड्रेस परिधान
‘करीना कपूरमुळे मी खूप पैसे कमावले’, पायल राजपूतचा माेठा खुलासा

हे देखील वाचा