छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का‘ यातील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. वैशाली ठक्करने 15 ऑक्टोबर रोजी इंदूरमधील तिच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिचा जन्म 15 जुलै1992 साली झाला आहे. वैशालीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये तिने उद्योगपती राहुल नवलानी आणि त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. 16 ऑक्टोबर रोजी वैशालीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अभिनेत्रीचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबीयांनी वैशालीची शेवटची इच्छा असल्याने तिचे नेत्रदान केले.
वैशाली ठक्करने केले नेत्रदान
वैशाली ठक्करच्या चुलत बहिणीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “वैशालीला तिचे डोळे खूप आवडत होते आणि ती मरण्यापूर्वी तिचे डोळे दान करण्याची इच्छा अनेकदा सांगायची. याबाबत ती आईशीही बाेलली हाेती.” चुलत भावाच्या म्हणण्यानुसार, “अभिनेत्रीच्या शेवटच्या इच्छेनुसार कुटुंबाने रविवारी, 16 ऑक्टोबर रोजी अंतिम संस्कारापूर्वी तिचे डोळे जिल्हा आरोग्य अधिकार्यांना दान केले आहेत जेणेकरून त्या सुंदर डोळ्यांनी हे जग इतर कोणालाही पाहता येईल.
View this post on Instagram
वैशाली शेवटची 2019मध्ये ‘मनमोहिनी’ मालिकेत दिसली
वैशाली ठक्करने स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून टीव्हीवर पदार्पण केले. ज्यामध्ये तिने 2015 ते 2016 पर्यंत संजनाची भूमिका साकारली होती. 2016 मध्ये तिने ‘ये है आशिकी’मध्ये वृंदाची भूमिका केली होती. या शोनंतर ती ‘ये वादा रहा’, ‘ससुराल सिमर का’, ‘सुपर सिस्टर’, ‘लाल इश्क’ मध्ये दिसली हाेती. वैशाली शेवटची 2019च्या ‘मनमोहिनी’ शोमध्ये दिसली होती. वैशालीने टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे. वैशाली ही मूळची उज्जैनमधील महिदपूरची आहे.
वैशाली ठक्करच्या मृत्य प्रकरणी पोलिसांनी राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा यांच्या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघेही वैशालीच्या शेजारी राहणारे आहेत. आत्महत्ये आधी वैशालीने पाच पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यात राहुलचे नाव आहे.
अधिक वाचा-
–लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’साठी रुपाली गांगुली नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रीला केले होते फायनल
–“उंदीर, किडे असलेली डाळ खायचो”; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्यानं सांगितली तुरुंगातील धक्कादायक गोष्टी