Saturday, April 20, 2024

‘करीना कपूरमुळे मी खूप पैसे कमावले’, पायल राजपूतचा माेठा खुलासा

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री करिना कपूर हिच्या चित्रपटातील कोणताही डायलॉग एखाद्या अभिनेत्रीचे आयुष्य बदलू शकतो, असा तुम्ही विचारही केला नसेल, पण याचा खुलासा खुद्द साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री पायल राजपूत हिने केला आहे. पायलने तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याचे श्रेय तिने करीनाला दिले आहे. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने एक मजेदार किस्सा सांगितला आहे.

पायल राजपूत (payal rajput) हिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, “मला करिना कपूरच्या ‘जब वी मेट’ चित्रपटातील ‘सिखानी हूं मैं भटिंडा की’ हा डायलॉग खूप आवडतो. हा डायलॉग मी सगळ्या ऑडिशनमध्ये बोलली हाेती.”

पायल राजपूत पुढे म्हणाली की, “मी करीनामुळे फार पैसे कमावलेले आहेत. ‘जब वी मेट’ या चित्रपटातील गीतच्या एका लाईनने मी अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या. मी पहिल्यांदा जेव्हा मुंबईत आली तेव्हा मला काहीच माहीत नव्हते. काय करावं तेच समजत नव्हतं, कारण मी अभिनयाचं फॉर्मल ट्रेनिंग घेतलेलं नव्हतं.”अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा मला ऑडिशनसाठी बोलावले जायचे तेव्हा मी म्हणायचे की,” मी सुंदर आहे, माझी उंचीही चांगली आहे”, पण जेव्हा मला सांगितले जायचे की, तू काय करू शकतेस तेव्हा मी ‘सिखानी हूं’ आणि ‘मैं भटिंडा की’  डायलाॅग ऐकवायची. अरे बापरे… मी किती वेळा हे स्टाेरी केली आणि त्यामुळे मला जवळपास 6-7 जाहिरातीमध्ये काम मिळाले, शिवाय मला पहिला शो देखील मिळाला, करीना कपूर, तुमचे खूप खूप आभार.”

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ चित्रपटातील करीना कपूरचे अनेक डायलॉग्स खूप प्रसिद्ध झाले. करीना आणि शाहिद कपूरचा हा चित्रपट एक संस्मरणीय चित्रपट मानला जातो.

पायलचा ‘जिना’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
पायलच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर पायलचा तेलुगु चित्रपट ‘जिना’ 21 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. इशान सुयश दिग्दर्शित या चित्रपटात सनी लिओन आणि पायल राजपूत मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
धाडस असावं तर असे! बॉलिवूडमधील घराणेशाहीवर यामी गौतम स्पष्टच बाेलली

जान्हवी कपूरने बहिणीला दिला मोलाचा सल्ला; म्हणाली, कोणत्याच अभिनेत्याला करु नको …

हे देखील वाचा